अधिकार्यांनी केली अतिक्रमणाची पाहणी
By Admin | Updated: May 27, 2014 00:58 IST2014-05-27T00:20:23+5:302014-05-27T00:58:14+5:30
भूम : शहरातील वाढलेले अतिक्रमण हटविण्यासाठी जिल्हाधिकार्यांच्या सूचनेनुसार मंगळवारी कारवाई करण्यात येणार आहे़

अधिकार्यांनी केली अतिक्रमणाची पाहणी
भूम : शहरातील वाढलेले अतिक्रमण हटविण्यासाठी जिल्हाधिकार्यांच्या सूचनेनुसार मंगळवारी कारवाई करण्यात येणार आहे़ हे अतिक्रमण हटविण्यापूर्वी अधिकार्यांनी सोमवारी या परिसराची पाहणी केली आहे़ पोलिस बंदोबस्तात ही धडक कारवाई होणार आहे़ जिल्हाधिकारी डॉ़ प्रशांत नारनवरे यांनी भूम शहर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी प्रशासनाला आदेश दिले आहेत़ पालिकेने यासाठी भोंगा लावून सर्वांना अतिक्रमण काढण्याबाबत सूचना दिल्या आहेत़ गोलाई चौक ते परंडा रोड, बसस्थानक ते कुंथलगिरी व पार्डी मार्गावरील अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत़ उपविभागीय अधिकारी संतोष राऊत यांनी याबाबत बांधकाम विभागाचे कर्मचारी, पोलिस प्रशासनाला माहिती दिली आहे़ तर राऊत यांनी सोमवारी गोलाई चौक, परंडा रोड, पार्ड रोड, कुंथलगिरी रोडवरील अतिक्रमण व इतर बाबींची पाहणी केली़ यावेळी तहसीलदार अरविंद बोळंगे, मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर, बांधकाम विभागाचे नकाते, पोनि रणजित सावंत आदी उपस्थित होते़ (वार्ताहर)भूम शहरात मंगळवारी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार आहे़ यासाठी भूम, परंडा, अंबी येथील पोलिस कर्मचार्यांचा बंदोबस्त घेतला जाणार असून, बांधकाम उपविभाग, तहसीलचे कर्मचारी राहणार आहेत़ शहरातील प्रमुख मार्गावरील अतिक्रमण काढून नंतर शहरातील विविध भागातील अतिक्रमणे काढण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी संतोष राऊत यांनी सांगितले़