विभागीय पथकाने केली कामांची पाहणी
By Admin | Updated: August 23, 2014 00:55 IST2014-08-23T00:55:06+5:302014-08-23T00:55:27+5:30
जालना: संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानातंर्गत शहरातील स्वच्छतेची तपासणी करण्यासाठी आलेल्या विभागीय पथकाने शहरातील चौक सुशोभिकरणाच्या कामांची पाहणी केली.

विभागीय पथकाने केली कामांची पाहणी
जालना: संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानातंर्गत शहरातील स्वच्छतेची तपासणी करण्यासाठी आलेल्या विभागीय पथकाने शहरातील चौक सुशोभिकरणाच्या कामांची पाहणी केली.
सकाळी ११ वाजता हे पथक पालिकेत दाखल झाले. या पथकात विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त विजयकुमार फड, नगर पालिका पशासन विभाग औरंगाबादचे सहसंचालक निलावाड, आरोग्य सेवा विभागातील साख्यिकी अधिकारी मुरलीधर झापे, मार्ग प्रकल्प विभागाचे कानडे, जीवन प्राधिकरणचे उपअभियंता किरण पाटील, सहाय्यक नगर रचना संचालक प्रशांद गायकवाड, अंबड पालिकेचे मुख्याधिकारी राहुल सूर्यवंशी, पत्रकार आर. वाय. जाबा, नगरपालिका प्रशासन विभागाचे पठाण पेशकर यांचा समावेश होता.
यावेळी नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे, उपनगराध्यक्ष शाहआलम खान, नगरसेवक संजय भगत, अरूण मगरे, महावीर ढक्का, विजय जाधव, उपमुख्याधिकारी मुखेडकर, नगरअभियंता अग्रवाल यांच्यासह पालिकेतील सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
नगराध्यक्षा व उपाध्यक्षांनी पथकाचे स्वागत केले. त्यानंतर सुमारे तासभर बैठक घेण्यात आली. यात पथकाने अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून काही सूचना केल्या.
त्यानंतर या पथकातील अधिकाऱ्यांनी नगर पालिका कार्यालयासमोरील उद्यान, मस्तगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, मामा चौक, शिवाजी पुतळा, मोतीबागेस भेट देवून पाहणी केली. (प्रतिनिधी)