मुंबईच्या पथकाकडून गोदामाची पाहणी

By Admin | Updated: August 13, 2014 00:23 IST2014-08-13T00:02:00+5:302014-08-13T00:23:13+5:30

जिंतूर: येथील शासकीय धान्य गोदामातील घोटाळ्याची वृत्तमालिका प्रकाशित झाल्यानंतर गोदामाची तपासणी करण्यासाठी मुंबई येथून पथक जिंतुरात दाखल झाले आहे

Inspect the warehouse from the Mumbai squad | मुंबईच्या पथकाकडून गोदामाची पाहणी

मुंबईच्या पथकाकडून गोदामाची पाहणी

जिंतूर: येथील शासकीय धान्य गोदामातील घोटाळ्याची वृत्तमालिका प्रकाशित झाल्यानंतर गोदामाची तपासणी करण्यासाठी मुंबई येथून पथक जिंतुरात दाखल झाले आहे. पथक काय कारवाई करणार, याकडे आता जनतेचे लक्ष लागले आहे.
जिंतूर येथील शासकीय धान्य गोदामात अनेक गैरप्रकार असल्याची वृत्तमालिका ‘लोकमत’ने प्रकाशित केली होती. या मालिकेची दखल घेत मुंबईच्या पुरवठा विभागातून पुरवठा अधिकारी केदारी व त्यांचे सहाय्यक ११ आॅगस्ट रोजी जिंतुरात दाखल झाले. त्यांनी जिंतूर- परभणी रस्त्यावरील धान्य गोदाम, बामणी प्लॉट भागातील धान्य गोदाम या दोन गोदामाची ११ व १२ आॅगस्ट रोजी तपासणी केली. शासकीय गोदामध्ये शिल्लक असलेल्या धान्यापेक्षा जास्तीचे धान्य आढळल्याचे समजते. विशेष म्हणजे अनेक दुकानदारांकडून परमीट गोळा करुन धान्य वाटप केल्याचे कागदपत्र दाखविल्या जाते. प्रत्यक्षात दलालांच्या सोयीनुसार गोदामातून धान्य उचलल्या जाते. अचानक आलेल्या पथकामुळे गोदामपाल व दलालांचे धाबे दणाणले आहेत. (वार्ताहर)
तो माल दलालांचा?
गोदाममध्ये पथकाला आढळून आलेला जास्तीचा माल प्रत्यक्ष गोदामातील साठा नसून दलालांनी न नेलेले धान्य गोदामातच पडून असल्याची चर्चा होत होती. त्यामुळे शासकीय गोदामात अतिरिक्त माल कसा, याबाबत तर्कविर्तक लढविल्या जात आहे.
चौकशी सुरु
४मुंबईच्या पथकाकडून चौकशी चालू असून पथकाला नेमक्या कोणत्या गोष्टी आढळल्या याबाबतचा नेमका अहवाल अद्यापपर्यंत हाती आला नाही.

Web Title: Inspect the warehouse from the Mumbai squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.