रोहयो कामांची उपायुक्तांकडून पाहणी
By Admin | Updated: July 23, 2014 00:34 IST2014-07-22T23:50:11+5:302014-07-23T00:34:31+5:30
अकोला देव : जाफराबाद तालुक्यातील अकोला देव येथे रविवारी २० जुलै रोजी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कामाची पाहणी नरेगाचे उपायुक्त उदय पाठक यांनी केली.

रोहयो कामांची उपायुक्तांकडून पाहणी
अकोला देव : जाफराबाद तालुक्यातील अकोला देव येथे रविवारी २० जुलै रोजी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कामाची पाहणी नरेगाचे उपायुक्त उदय पाठक यांनी केली. कामाची पाहणी करून माहिती जाणून घेतली. यावेळी उपजिल्हाधिकारी रमेश कायंदे उपस्थित होते.
सन २०१२ - १३ मध्ये दुष्काळाच्या काळात नरेगा अंतर्गत परिसरात सिंचनाची मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आली. त्यामुळे परिसरातील जलसिंचनाची सध्या काय परिस्थिती आहे, याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी रोजगार हमी योजनेचे पथकच परिसरात दाखल झाले आहे. काम बघून पाठक यांनी समाधान व्यक्त केले. पंरतु काही कामे अर्धवटच राहिल्याने संबधित अधिकाऱ्यांना कडक शब्दात सूचना केल्या. राहिलेली कामे तात्काळ मार्गी लावावे यासाठी कोणाचीही गय केली जाणार नाही, अशी तंबी पाठक यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिली. यावेळी भोकरदनचे गटविकास अधिकारी लोखंडे, जाफराबादचे चौगुलकर, सहाय्यक गटविकास अधिकारी अहिरे, तहसीलदार एल.डी.सोनवणे, संदिप ढाकणे, तालुका कृषी अधिकारी सागावे, मंडळ कृषी अधिकारी केदारनाथ बुधवंत, एम.बी.औटी, ग्रामविकास अधिकारी व्ही. टी. जायभाये, तलाठी सोनूने, सरपंच रघुनाथ कदम, लक्ष्मन सवडे, भावराव दरेकर, दिगंबर सवडे, रत्नाकर भोरजे, कृषी सहाय्यक डी.ए.उगले, खरात यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती. (वार्ताहर)