‘तंंटामुक्ती’च्या रक्कमेची होणार चौकशी
By Admin | Updated: March 10, 2016 00:36 IST2016-03-10T00:21:36+5:302016-03-10T00:36:51+5:30
परतूर : तालुक्याला तीन वर्षांत महात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेच्या माध्यमातून ४२ लाख रुपये मिळाले आहेत. यामध्ये १८ गावांचा समावेश आहे. या गावांना मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेची आता चौकशी होणार आहे.

‘तंंटामुक्ती’च्या रक्कमेची होणार चौकशी
परतूर : तालुक्याला तीन वर्षांत महात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेच्या माध्यमातून ४२ लाख रुपये मिळाले आहेत. यामध्ये १८ गावांचा समावेश आहे. या गावांना मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेची आता चौकशी होणार आहे.
महात्मा गांधी तंटामुक्त मोहिमे अंतर्गत तालुक्यातील १८ ग्रामपंचायतीला सन २०१३-१४, २०१४-१५ या तीन वर्षांत ४२ लाख रु. आले. या मोहिमेच्या निमित्ताने या गावातील काही प्रश्न सोडविण्यासाठी हा निधी उपयुक्त ठरला. यामध्ये श्रीधर जवळा २ लाख, शिंगोना २ लाख, शेवगा २ लाख, वाई २ लाख, आनंदवाडी २ लाख, अांबा ४ लाख, मसला १ लाख, सोयंजना २ लाख, पडळी १ लाख, सालगाव २ लाख, वरफळ ५ लाख, राणी वाहेगाव २ लाख, खांडवी ३ लाख, सिरसगाव २ लाख, वरफळवाडी २ लाख, सातोना ७ लाख रु. असा एकूण ४२ लाख रुपये आले होते. ही बक्षिसांची रक्कम कशी खर्च करायची यासाठी नियमावली घालून दिली होती. हा निधी गावस्तरावर विविध उपक्रम राबवून खर्च करावयाचा होता. यामध्ये गावातील ज्या मातांनी मुलींना जन्म दिला अशा मातांना प्रत्येकी ५०० रु. ‘कन्यारत्न जन्मानंद भेट’ तर सासरी गेलेल्या व मुलींनाजन्म देणाऱ्या मातांना ‘माहेर भेट’ ५०० रु. प्रदान करावे. गावात ज्यांनी व्यसनमुक्ती केली व सहा महिने लोटले अशांना ३०० रु. या बक्षिसाच्या रकमेतील १५ टक्के खर्च प्रसिध्दी व या मोहिमेच्या प्रचारासाठी खर्च करणे आवश्यक आहे. या सर्व खर्चाचे व राबवण्यात योणाऱ्या उपक्रमांचे नियोजन ग्रामसभेतच करणे बंधनकारक आहे. बचत गटातील तीन महिलांची निवड करुन त्यांना प्रत्येकी ५०० रु. पारितोषिक देणे. याबरोबरच गाव परिसरात वृक्ष लागवड करणे, पर्यावरणाचा समतोल राखणे, जलसंवर्धनाची कामे करणे, तलावातील गाळ काढणे, सौर उर्जेचा वापर करुन जनावरांचे आरोग्य विषयक शिबिरांचे आयोजन करणे आदी उपक्रमांचा समोवश आहे. पारितोषिक मिळालेल्या ग्रामपंचायतींनी यातील बऱ्याच उपक्रमांना बगल दिल्याचे दिसते.