चौकशी समिती आज बीडमध्ये
By Admin | Updated: September 23, 2014 23:43 IST2014-09-23T23:41:57+5:302014-09-23T23:43:04+5:30
बीड : जिल्हा परिषदेतील अनियमिततेच्या चौकशीसाठी बुधवारी अप्पर आयुक्तांची समिती येत आहे.

चौकशी समिती आज बीडमध्ये
बीड : जिल्हा परिषदेतील अनियमिततेच्या चौकशीसाठी बुधवारी अप्पर आयुक्तांची समिती येत आहे.
जिल्हा परिषदेतील तेरावा वित्त आयोग, झेडपीआर कामांत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली होती. यासंदर्भात ग्रामविकास विभागापासून ते आयुक्त कार्यालयापर्यंत तक्रारी गेल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने आयुक्त संजीव जैस्वाल यांनी अपर आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखालील समिती नियुक्त केली आहे. ही समिती १९ सप्टेंबर रोजीच येणार होती; पण चौकशी पुढे ढकलण्यात आली.
आता बुधवारचा मुहूर्त मिळाला आहे. यापूर्वी तीन समित्या चौकशी करुन गेल्या;पण ठोस कारवाई झाली नाही. आता पापळकर समिती येत आहे. ही समिती फार्स ठरते की घोटाळेबाजांना दणका देते ? याचे उत्तर येणाऱ्या काळात मिळेलच. चौकशीच्या ससेमिऱ्याने अनेकांच्या झोपा उडाल्या आहेत़ (प्रतिनिधी)