महा ई-सेवा केंद्रांची चौकशी करणार

By Admin | Updated: June 23, 2017 23:35 IST2017-06-23T23:31:02+5:302017-06-23T23:35:12+5:30

परभणी :महा ई-सेवा केंद्र चालक अधिकचे पैसे घेऊन विद्यार्थ्यांची लूट करीत असतील तर त्यांची चौकशी करुन कारवाई केली जाईल,

To inquire into the Maha e-Seva Kendra | महा ई-सेवा केंद्रांची चौकशी करणार

महा ई-सेवा केंद्रांची चौकशी करणार

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : महा ई-सेवा केंद्रांना विविध प्रमाणपत्रे देण्यासंदर्भात शासनाने दर ठरवून दिले आहेत. जर काही महा ई-सेवा केंद्र चालक अधिकचे पैसे घेऊन विद्यार्थ्यांची लूट करीत असतील तर त्यांची चौकशी करुन कारवाई केली जाईल, अशी माहिती येथील तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी दिली.
परभणी येथील काही महा ई-सेवा केंद्र चालकांकडून विविध प्रमाणपत्रे काढण्यासाठी विद्यार्थ्यांकडून जास्तीचे पैसे आकारले जात असल्याचा प्रकार ‘लोकमत’च्या वतीने गुरुवारी करण्यात आलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघडकीस आला होता. या संदर्भातील वृत्त शुक्रवारी प्रसिद्ध झाल्यानंतर महा ई-सेवा केंद्र चालकांमध्ये खळबळ उडाली. याबाबत तहसीलदार विद्याचरण कडवकर म्हणाले की, शासनाने महा ई-सेवा केंद्र चालकांना प्रमाणपत्रे देण्यासंदर्भात दर ठरवून दिले आहेत. अधिकचे पैसे घेणाऱ्या महा ई-सेवा केंद्रांची चौकशी करण्यात येईल. यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. जनतेनेही शासकीय दरापेक्षा अधिकचे पैसे देऊ नयेत, काही तक्रार असल्यास तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा.

Web Title: To inquire into the Maha e-Seva Kendra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.