नाट्यातून विज्ञानाचा प्रसार करणे अभिनव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:17 IST2021-02-05T04:17:50+5:302021-02-05T04:17:50+5:30
सेवानिवृत्त प्राचार्य तथा महर्षी शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह दत्तात्रय पदे लिखित ‘चार विज्ञान नाटिका’ या पुस्तकाचे प्रकाशन दिनांक ३० ...

नाट्यातून विज्ञानाचा प्रसार करणे अभिनव
सेवानिवृत्त प्राचार्य तथा महर्षी शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह दत्तात्रय पदे लिखित ‘चार विज्ञान नाटिका’ या पुस्तकाचे प्रकाशन दिनांक ३० रोजी महर्षी विद्यालय येथे डॉ. गर्गे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नारायण मुंडले, उल्हास वडोदकर यांची प्रमुख उपस्थिती होती तर प्रा. डॉ. के. व्ही. काळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ‘चार विज्ञान नाटिका’ या पुस्तकातून भास्कराचार्य, कृष्णविवर, वेदज्ञ गणिती आणि कमला सोहनी यांच्याविषयीच्या नाटिका मांडण्यात आल्या आहेत.
यावेळी डाॅ. गर्गे यांनी ‘चार विज्ञान नाटिका’ या विज्ञानाचा प्रसार करणाऱ्या पुस्तकाचे आणि विज्ञान प्रसारासाठी नाट्य हे अनोखे माध्यम निवडणाऱ्या पदे यांचे कौतुक केले. ते म्हणाले की, आधुनिक भारताचा शिल्पकार आज अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होणे ही विज्ञान प्रेमींप्रमाणे प्रत्येकासाठीच प्रेरणादायी बाब आहे. वैज्ञानिक सत्य कायम ठेवून कल्पना विस्तार करून नाट्य करण्याचा प्रयत्न करा. यातूनच भविष्याची चाहुल लागते, असेही डॉ. गर्गे यांनी विद्यार्थ्यांना सुचविले.
महर्षी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुषमा देशपांडे यांनी अनुभव कथन केले. वैशाली कुलकर्णी, शीतल पांडे यांनी सूत्रसंचालन केले तर अंकुश तांबे यांनी आभार मानले.
फोटो ओळ :
द. ल. पदे लिखित ‘चार विज्ञान नाटिका’चे प्रकाशन डॉ. रंजन गर्गे आणि मान्यवरांनी केले.