फसवणूक प्रकरणातून आरोपीची निर्दोष मुक्तता

By Admin | Updated: May 11, 2014 00:40 IST2014-05-11T00:31:57+5:302014-05-11T00:40:50+5:30

परभणी : शासकीय सेवेत नोकरी लावतो म्हणून फसवणूक केल्याच्या प्रकरणात संदीप राऊत यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

Innocent acquitted of fraud case | फसवणूक प्रकरणातून आरोपीची निर्दोष मुक्तता

फसवणूक प्रकरणातून आरोपीची निर्दोष मुक्तता

 परभणी : शासकीय सेवेत नोकरी लावतो म्हणून फसवणूक केल्याच्या प्रकरणात संदीप राऊत यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. विशेष म्हणजे या प्रकरणात प्रथमच व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्षी पुरावा घेण्यात आला. या प्रकरणात अ‍ॅड.एस.एम. हाशमी यांनी माहिती दिली, जगन्नाथ श्यामराव काळे यांच्या तक्रारीवरुन आरोपी संदीप आनंदराव राऊत यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. शासकीय सेवेत नोकरी लावतो म्हणून संदीप राऊत यांनी हजारो रुपये घेतले. परभणी येथील एम.एस.ई.बी. कार्यालयासमोरील हॉटेलमध्ये जगन्नाथ शेळके यांना महाराष्टÑ राज्य वितरण कंपनी बांद्रा मुंबई जावक क्र.१२१५ बाबतचे नियुक्तीचे आदेशही दिले. परंतु जगन्नाथ शेळके यांच्याकडून त्यांच्या शिक्षणाचे कागदपत्रे घेतली व फसवणूक केली, असे तक्रारकर्त्याचे म्हणणे होते.या प्रकरणात सय्यद मुजम्मील हाशमी यांनी आरोपीतर्फे न्यायालयात बाजू मांडली. आरोपी हा औरंगाबाद येथील हर्सूल जेलमध्ये जेरबंद असल्याने या प्रकरणात परभणी जिल्हा न्यायालयात पहिल्यांदाच व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्षी पुराव्याची व्यवस्था करण्यात आली. न्या.गोसलवाड यांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून तब्बल आठ महिन्यानंतर ९ मे रोजी या प्रकरणात आरोपीची निर्दोष मुक्तता केली.(प्रतिनिधी)

Web Title: Innocent acquitted of fraud case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.