भूम तालुक्यात कांदा लागवड झाली ठप्प !
By Admin | Updated: July 30, 2014 00:54 IST2014-07-30T00:32:45+5:302014-07-30T00:54:57+5:30
भूम : पावसाअभावी तालुक्यात कांदा लागवड थांबली असून, यंदा कांद्याचे क्षेत्र घटण्याची शक्यता काही जाणकार शेतकऱ्यांमधून वर्तविली जात आहे.
भूम तालुक्यात कांदा लागवड झाली ठप्प !
भूम : पावसाअभावी तालुक्यात कांदा लागवड थांबली असून, यंदा कांद्याचे क्षेत्र घटण्याची शक्यता काही जाणकार शेतकऱ्यांमधून वर्तविली जात आहे.
तालुक्यात अलीकडच्या काळात इतर पिकांसोबत शेतकरी कांदा लागवडीकडे वळला आहे. यासाठी लागणारे बी आणून रोपे तयार करण्याची प्रक्रिया तालुक्यात पूर्ण झाली आहे. परंतु, मागील पंधरा दिवसांपासून पाऊस नसल्याने लागवडीयोग्य झालेली रोपे लागवड करण्यास पाण्याअभावी अडचण होत आहे. तालुक्यात चिंचोली, उळूप, वरुड, सावरगाव, दरेवाडी, भूम, गोलेगाव, चिंचपूर, वालवड, वांगी, माणकेश्वर आदी भागात कांदा लागवडीचे मोठे क्षेत्र आहे. दरवर्षी जून, जुलै महिन्यात पावसाळी हंगामात कांदा लागवड केली जाते. परंतु यंदा जून महिना कोरडा गेला. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी कांदा लागवडीचे बी टाकून रोपे तयार केली होती, त्याची उपलब्ध पाण्यावर उगवण चांगल्याप्रकारे झाली असली तरी ढगाळ हवामानामुळे व अल्प पावसामुळे रोपामध्ये घट झाल्याने लागवडीचे क्षेत्र घटून शेतकऱ्यांना आर्थिक झळ पोहोचत आहे. दरम्यान, कांदा उत्पादन घटण्याची शक्यताही काही जाणकार शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)