शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पुन्हा अन्याय; मराठवाड्याच्या वाट्याचे पाणी नाशिक विभागात वळविण्याची तयारी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 16:47 IST

Water Crisis in Marathwada : लॉकडाऊनमध्ये मराठवाड्याच्या वाट्याला येणारे पाणी नाशिक विभागात पळविले जाण्याची शक्यता मराठवाडा विकास मंडळाचे माजी सदस्य तथा जलतज्ज्ञ शंकर नागरे यांनी वर्तविली.

ठळक मुद्दे दमणगंगेच्या पाण्याचा मुद्दा अजून कागदावरच राज्य शासनाने पाणी प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज नाशिक विभाग साधारण जल उपलब्धी या प्रकारात मराठवाडा विभाग हा अतितुटीच्या प्रकारात येतो.

औरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळी भागाला कोकणातील पाणी देण्याचे सप्टेंबर २०१९ मध्ये जाहीर झाले. ही बाब नाशिककरांच्या पचनी पडली नाही. त्यामुळे त्यांनी मराठवाड्यात येणारे कोकणातील पाणी वळविण्याची तयारी सुरू केली आहे. ( Ready to divert Marathwada's share of water to Nashik division?) 

कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये सिंचन योजनेची कामे सुरू करण्यास मुभा दिलेली आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये मराठवाड्याच्या वाट्याला येणारे पाणी नाशिक विभागात पळविले जाण्याची शक्यता मराठवाडा विकास मंडळाचे माजी सदस्य तथा जलतज्ज्ञ शंकर नागरे यांनी वर्तविली. नारपार - गोदावरी योजनेचे ३.४२ अब्ज घनफूट पाणी करंजवन व पुणेगाव योजनेसाठी, दमणगंगा - वैतरणा -गोदावरी या योजनेचे ७.१२ अब्ज घनफूट, तर कदवा धरणाचे सिंचन वाढविण्यासाठी दमणगंगा - एकदरे-गोदावरी योजनेचे ५.०५ अब्ज घनफूट पाणी गंगापूर धरण परिसरात सिंचन वाढविण्यासाठी नाशिक परिसरातच वापरण्याची तयारी सुरू आहे. यावरून मराठवाड्यासाठी प्रस्तावित केलेले १५.६० अब्ज घनफूट पाणी नाशिक विभाग पळविणार आहे, असेच सध्या चित्र आहे. विभागातील लोकप्रतिनिधी व जनतेने याला पायबंद घालण्याची गरज असल्याचे नागरे म्हणाले. वेळीच असे केले नाही, तर उर्ध्व वैतरणा, उल्हास नदी उपखोऱ्यातून येणारे पाणीही मराठवाड्याला मिळण्याबाबत शंका आहे. या प्रकारामुळे मराठवाड्यातील जनतेची दिशाभूल होत असल्याचे चित्र निर्माण होईल. विभागातील लोकप्रतिनिधींनी जागरूक राहून सदरील पाणी नाशिक विभागात वळविले जाणार नाही, यासाठी आतापासूनच सावधान होणे गरजेचे आहे.

...तर हा न्यायालयाचा अवमान होईलजलतज्ज्ञ नागरे यांनी सांगितले, एकात्मिक राज्य जल आराखड्यात दिलेल्या पाणी उपलब्धतेनुसार नाशिक विभाग साधारण जल उपलब्धी या प्रकारात येताे. मराठवाडा विभाग हा अतितुटीच्या प्रकारात येतो. मेंढेगिरी समितीच्या अहवालानुसार व जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या २०१४च्या आदेशानुसार नाशिक विभागातील गोदावरी खोऱ्यात जायकवाडी धरणाच्यावर पाणी वापराच्या योजना घेण्यास बंदी आहे. तसेच सप्टेंबर २०१६मध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारसुद्धा जायकवाडीवरील नाशिक, अहमदनगर भागात पाणी वापरांच्या योजनांवर निर्बंध घातले आहेत. एवढे निर्बंध असतांना १५.६० अब्ज घनफूट पाणी नाशिक घेत असेल, तर हा न्यायालयाचा अवमान ठरेल.

पश्चिमी वाहिन्यांबाबत अचानक बैठक कशासाठीजलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे मंगळवारी पश्चिमी वाहिन्यांतील पाणी आणि मराठवाड्यातील पाणीटंचाई व पाहणी याबाबत बैठक झाल्याचे ‘लोकमत’मध्ये वाचले. परंतु अचानक बैठक कशी काय घेतली. पाटबंधारे मंडळातून कुणीही त्या बैठकीसाठी गेलेले नव्हते. त्यामुळे हा काय प्रकार आहे, हे समजण्यास मार्ग नसल्याचे नागरे म्हणाले.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पWaterपाणीMarathwadaमराठवाडाState Governmentराज्य सरकारNashikनाशिक