अतिक्रमण हटाव मोहिमेत अडथळा
By Admin | Updated: May 14, 2014 23:56 IST2014-05-14T23:32:25+5:302014-05-14T23:56:11+5:30
उस्मानाबाद : तुळजापूर पालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत अडथळा आणल्याप्रकरणी दोघांविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अतिक्रमण हटाव मोहिमेत अडथळा
उस्मानाबाद : तुळजापूर पालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत अडथळा आणल्याप्रकरणी दोघांविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, नगर परिषदेच्या वतीने २ मे रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास तुळजापूर शहरातील खटकाळ गल्ली रोडवरील अतिक्रमण काढण्यासाठी भागात गुणवंत कदम (उत्तर विभाग प्रमुख, न.प. तुळजापूर) व त्यांचे सहकारी वाहनासह दाखल झाले होते. या पथकाने अतिक्रमण काढण्यास सुरूवात केली असता पिंटू वीरप्पा बेद्रे व वीरप्पा बेद्रे या दोघांनी सदरील कामात अडथळा निर्माण केला, अशी फिर्याद गुणवंत कदम यांनी दिली आहे. यावरून १३ मे रोजी उपरोक्त दोघांविरूद्ध तुळजापूर ठाण्यात भादंवि कलम ३५३, ३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास सपोफौ शिंदे हे करीत आहेत. (प्रतिनिधी)