परभणीत ओमायक्राॅनचा शिरकाव, २ रुग्णांचे निदान; तर औरंगाबादेत आणखी एका रुग्णाची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2022 17:14 IST2022-01-20T17:13:47+5:302022-01-20T17:14:44+5:30
Omicron Variant औरंगाबादसह यापूर्वी उस्मानाबाद, जालना, लातूर आणि नांदेड येथे ओमायक्राॅनचे रुग्ण आढळलेले आहेत.

परभणीत ओमायक्राॅनचा शिरकाव, २ रुग्णांचे निदान; तर औरंगाबादेत आणखी एका रुग्णाची वाढ
औरंगाबाद : परभणी येथे बुधवारी ओमायक्राॅनने (Omicron Variant ) शिरकाव केला. येथे ओमायक्राॅनच्या २ रुग्णांचे निदान झाले आणि मराठवाड्यातील आणखी एका जिल्ह्याचा ओमायक्राॅनच्या यादीत समावेश झाला. याबराेबरच औरंगाबादेत आणखी एका रुग्णाचे निदान झाले असून, औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या एकूण रुग्णांची संख्या आता २० झाली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी एकाच दिवसात ओमायक्राॅनच्या १४ रुग्णांचे निदान झाले होते. परंतु गेल्या १५ दिवसांत हे रुग्ण कोरोनामुक्त आणि ओमायक्राॅनमुक्तदेखील झाले आहेत. औरंगाबादसह यापूर्वी उस्मानाबाद, जालना, लातूर आणि नांदेड येथे ओमायक्राॅनचे रुग्ण आढळलेले आहेत. आता परभणीतही २ रुग्णांचे निदान झाले आहे.
मराठवाड्यातील एकूण ओमायक्राॅनबाधित
जिल्हा - एकूण रुग्ण
औरंगाबाद - २०
उस्मानाबाद - ११
लातूर - ३
नांदेड - ३
जालना - ३
परभणी - २