शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

जायकवाडी धरणातून आतापर्यंत ७४ टीएमसी विसर्ग, तर १२५ टीएमसी झाली आवक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 20:12 IST

सोडलेल्या पाण्यात जायकवाडी ऐवढे आणखी एक धरण ७५% भरले असते यावरून धरणातून किती पाणी सोडण्यात आले याचा अंदाज येऊ शकतो. 

- संजय जाधवपैठण (औरंगाबाद) : गेल्या ४१ दिवसापासून जायकवाडी धरणातून विसर्ग करण्यात येत असून आतापर्यंत ७४ टीएमसी पाणी सोडण्यात आले असल्याची माहिती जायकवाडीचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी दिली. हंगामात सप्टेंबरच्या पहिल्या सप्ताहात धरणातून एवढे पाणी सोडण्याची ही पहिलीच वेळ असून अद्यापही विसर्ग सुरू असल्याने यंदा धरणातून सर्वाधिक विसर्ग होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

जायकवाडी धरण कसे भरेल ? या चिंतेत  मधल्या काही वर्षात मराठवाड्यातील जनतेला पोखरले होते. जायकवाडीच्या पाण्यासाठी मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र असा संघर्षही पहावयास मिळाला . परंतु, गेल्या चार वर्षांपासून धरण काठोकाठ भरत असल्याने मराठवाड्यास दिलासा मिळाला आहे. यंदातर धरणात येणारी आवक व विसर्ग या आधीचे सर्वच रेकॉर्ड मोडण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. १०२.७३ टीएमसी जलक्षमता असलेल्या जायकवाडी धरणात यंदा १ जून पासून ३५५९.७४ दलघमी (१२५.७० टीएमसी) पाण्याची आवक झाली.

या पैकी २०८६.३२ दलघमी (७४ टीएमसी ) पाणी धरणातून सोडण्यात आले आहे. सोडलेल्या पाण्यात जायकवाडी ऐवढे आणखी एक धरण ७५% भरले असते यावरून धरणातून किती पाणी सोडण्यात आले याचा अंदाज येऊ शकतो. दरम्यान धरणातून सांडव्याद्वारे ( गेट) ६७.१२ टीएमसी, जलविद्युत केंद्रातून ३.४६टीएमसी, उजव्या कालव्यातून २.६२ टीएमसी व डाव्या कालव्यातून ०.४७ टीएमसी असा एकूण ७४ टीएमसी विसर्ग करण्यात आल्याचे धरण अभियंता अशोक चव्हाण व विजय काकडे यांनी सांगितले. दरम्यान २०२१ मध्ये ४९ टीएमसी, २०२० मध्ये ८१ टीएमसी, २०१९ मध्ये ९५ टीएमसी व २०१७ मध्ये ९.८८ टीएमसी पाणी धरणातून सोडण्यात आले आहे. सोमवारी धरणाचे १८ दरवाजे १ फुटाने वर उचलून २०३६४ क्युसेक्स विसर्ग सुरू असून धरणात ९७.४७% जलसाठा झालेला आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादWaterपाणीRainपाऊस