महागाईला आळा बसावा!
By Admin | Updated: May 17, 2014 01:12 IST2014-05-17T01:05:08+5:302014-05-17T01:12:48+5:30
औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीचे निकाल शुक्रवारी जाहीर होत असतानाच महिला दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ताजा निकाल बघत होत्या व घराघरांत प्रतिक्रियाही व्यक्त होत होत्या.

महागाईला आळा बसावा!
औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीचे निकाल शुक्रवारी जाहीर होत असतानाच महिला दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ताजा निकाल बघत होत्या व घराघरांत प्रतिक्रियाही व्यक्त होत होत्या. ‘अब अच्छे दिन दूर नहीं, इंडियाचा कायापालट होणार, भारताचा विकास गुजरातसारखा व्हायला वेळ लागणार नाही, मोदी सरकार आल्यावर महागाई थोड्या-फार प्रमाणात का होईना कमी होईल,’ अशा प्रतिक्रिया, भावना व अपेक्षा महिला व्यक्त करीत होत्या. ‘अब की बार मोदी सरकार’ ही प्रचार सभांमधील घोषणा खरी ठरल्याचा घराघरांत आनंद व्यक्त होत होता. पेढे, लाडू वाटून व फटाके वाजवून या निकालाचे स्वागत होत असल्याचे दिसले. चांगले दिवस येणार मोदी सरकारमुळे देशाचा कायापालट होईल. महागाई कमी होईल अशी आशा आहे. मॉडेल गुजरात समोर असल्याने गुजरातसारखेच दिवस महाराष्ट्राला बघायला मिळतील, असे वाटते. -सुनंदा लालसरे अपेक्षापूर्ती करावी मोदींना निवडून देण्यामागे नागरिकांच्या खूप अपेक्षा आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती या सरकारने कमी करून दिलासा द्यावा. पेट्रोल, डिझेल यांचे दर कमी व्हावेत, अशा अनेक अपेक्षांनी भाजपाला मतदारांनी पसंती दिली आहे. या अपेक्षांची पूर्तता आता मोदींनी करावी. -शैलेजा जाधव महिलांना सुरक्षा हवी गेल्या काही दिवसांपासून महिलांच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्न उभे झाले आहेत. त्यांना एकटीने वावरणे जोखमीचे बनले आहे. महिलांना सुरक्षित वाटेल, अशी उपाययोजना नव्या सरकारने करावी, अशी अपेक्षा आहे. -दीप्ती जोशी सामान्यांचा विचार व्हावा सामान्य मतदारांनी एवढी वर्षे काँग्रेस सरकारचा अनुभव घेतला आहे. त्याचबरोबर गुजरातमध्ये झालेल्या विकास कामांविषयी माहिती घेतली आहे. ते बघून मोदी सरकारच्या येण्याने फक्त सरकारमध्येच नाही तर संपूर्ण भारतात बदल अपेक्षित आहे. सामान्य माणसाच्या हिताचा सर्वतोपरी विचार व्हावा. -श्रुती वाघमारे मत कामी आले आमचे मत वाया गेले नाही. आम्ही खूप अपेक्षेने सरकार बदलण्याचा निर्णय घेतला होता. त्या अपेक्षा आता मोदी सरकारकडून पूर्ण व्हाव्यात. मोदी सरकारच्या कार्यकाळात सर्वसामान्यांना समाधानाने जगता यावे. -मनीषा पाटील चित्र बदलण्याची आशा सलग दहा वर्षे काँग्रेस सरकारचा अनुभव घेतला. अपेक्षित सुधारणा होऊ शकल्या नाहीत; परंतु आता चित्र बदलेल, अशी आशा आहे. महागाई कमी करणे, गॅस सिलिंडरवर अनुदान, शिक्षणाचा खर्च सुसह्य होणे तसेच महिलांच्या सुरक्षेसंदर्भातील विचार नक्कीच केला जाईल. त्यामुळे जनतेचा हा कौल नवी दिशा देईल, असे वाटते. -लक्ष्मी साखरे प्रश्न सोडविले जावेत वाढती महागाई, महिलांची सुरक्षा, गॅस, पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमती यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. हे प्रश्न सोडविण्यासाठी काही उपाय लवकरात लवकर योजले जावेत, अशी अपेक्षा आहे. -जिजाबाई पाटील