एका तपानंतर सोयगाव तालुक्यात लाल्याचा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:04 IST2021-09-13T04:04:42+5:302021-09-13T04:04:42+5:30
सोयगाव : २०१२ मध्ये खरीप हंगामातील पिकांवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. त्याच लाल्या रोगाने सोयगाव तालुक्यात तब्बल एका ...

एका तपानंतर सोयगाव तालुक्यात लाल्याचा शिरकाव
सोयगाव : २०१२ मध्ये खरीप हंगामातील पिकांवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. त्याच लाल्या रोगाने सोयगाव तालुक्यात तब्बल एका तपानंतर पुन्हा डोकेवर काढले असून शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. अतिवृष्टीच्या नुकसानीत पुन्हा लाल्याचे थैमान पडण्याची चिन्हे निर्माण झाल्याने शेतकऱ्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
यंदाच्या खरीप हंगामात तालुक्यात ३२ हजार ०८८ हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आलेली आहे. त्यापैकी ठिबक सिंचनवर १८,५११ हेक्टरवर लागवड झालेली आहे. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीच्या तडाख्यात खरिपाची सर्वच पिके बाधित झाली आहेत. अचानक पावसाने उघडीप देताच लाल्या रोगाचे आक्रमण आढळून आले आहे. लाल्याची तीव्रता इतकी गंभीर स्वरुपात आहे की, कपाशीच्या झाडासह कैऱ्याही लालबुंद झाल्याचे दिसून येत असल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे.
-----
देठापासून ते बुंध्यापर्यंत प्रादुर्भाव
कपाशी लागवडक्षेत्रात लाल्याने आक्रमक रूप धारण केलेले आहे. झाडाच्या शेंड्यापासून ते बुंध्यापर्यंत लाल्याचा प्रादुर्भाव झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे वेचणीपूर्वीच ही पिके धोक्यात आली आहे. त्यामुळे अतिवृष्टीच्या संकटात लाल्याचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकऱ्यांना दुहेरी संकटाला सामोरे जावे लागत आहे.
120921\img_20210912_141541.jpg~120921\img_20210912_143033.jpg~120921\img_20210912_143133.jpg
सोयगाव-सोयगाव तालुक्यात लल्याचा संक्रमणाच्या बाधित कपाशी पिके,~सोयगाव-सोयगाव परिसरात लाल्याच्या प्रादुर्भावणे कैऱ्या झाल्या लालसर~सोयगाव-सोयगाव तालुक्यात लाल्याच्या संक्रमणाच्या पानेही सुकली