सोयगाव तालुक्यात पुन्हा संसर्ग वाढीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:07 IST2021-05-05T04:07:19+5:302021-05-05T04:07:19+5:30
सोयगाव : शहरासह तालुक्यात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढीस लागली आहे. मंगळवारी जरंडी कोविड केंद्रातून चार जणांना ऑक्सिजनअभावी औरंगाबादला ...

सोयगाव तालुक्यात पुन्हा संसर्ग वाढीस
सोयगाव : शहरासह तालुक्यात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढीस लागली आहे. मंगळवारी जरंडी कोविड केंद्रातून चार जणांना ऑक्सिजनअभावी औरंगाबादला पाठविण्यात आले, तर जरंडी केंद्र फुल्ल झाल्याने निंबायती कोविड केंद्राचे कुलूप उघडण्याची वेळ तालुका प्रशासनावर आली असून या केंद्रात आठ रुग्ण दाखल करण्यात आले.
तालुक्यात कमी होत असलेली रुग्णसंख्या शनिवारपासून पुन्हा वाढू लागली आहे. आरोग्य विभागाची दमछाक उडाली आहे. तालुक्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता ४४० वर पोहोचली आहे. आरोग्य विभाग आणि महसूल विभागाची चिंता वाढविणारा हा संसर्ग ठरला आहे.
सोयगाव तालुक्यात कमी झालेली रुग्णसंख्या वाढत असली तरीही नागरिकांनी घाबरून न जाता, लसीकरण करून सुरक्षित होण्याचा एकमेव मार्ग आहे. जरंडी केंद्रात लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन तहसीलदार प्रवीण पांडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीनिवास सोनवणे यांनी केले.
छायाचित्र ओळ -
जरंडीचे फुल्ल झालेले कोविड केंद्र.
040521\ynsakal75-050634634_1.jpg
जरंडी कोविड सेंटर