कुख्यात रईस बोक्याचा लॉकअपवर डोके आपटून आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:28 IST2020-12-17T04:28:36+5:302020-12-17T04:28:36+5:30
औरंगाबाद : कुख्यात रईस बोक्या याने अटक टाळण्यासाठी क्रांतीचौक पोलीस ठाण्याच्या आवारातील झेंड्याच्या बेसमेंट आणि लॉकअपवर डोके आपटून आत्महत्येचा ...

कुख्यात रईस बोक्याचा लॉकअपवर डोके आपटून आत्महत्येचा प्रयत्न
औरंगाबाद : कुख्यात रईस बोक्या याने अटक टाळण्यासाठी क्रांतीचौक पोलीस ठाण्याच्या आवारातील झेंड्याच्या बेसमेंट आणि लॉकअपवर डोके आपटून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी दुपारी घडली. यावेळी पोलिसांनी त्याला पकडून शांत केले आणि त्याच्यावर गुन्हा नोंदविला.
मोहम्मद रईस ऊर्फ बोक्या मोहम्मद हनीफ (रा. अन्सार कॉलनी, पाडेगाव), असे आरोपीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार आरोपी रईस बोक्या याने मोटारसायकल चोरी केल्याचे समजल्यावर क्रांतीचौक पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक संतोष राऊत, हवालदार मनोज चौहान, कॉन्स्टेबल संतोष सूर्यवंशी, सुकदने यांनी आज दुपारी त्याला साजापूर परिसरात ताब्यात घेतले. यानंतर त्याला क्रांतीचौक ठाण्यात नेण्यात आले. पोलीस आपल्याला अटक करणार असल्याचे समजताच त्याने ती टाळण्यासाठी पोलिसांच्या गाडीवर, ठाण्याच्या आवारातील राष्ट्रध्वजाच्या बेसमेंटवर डोके आपटण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिसांनी त्याला पकडून लॉकअपकडे नेले. तेव्हा लॉकअपच्या दरवाजावरही डोके आपटून त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला आणि पोलिसांना अश्लील शिवीगाळ केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी रईस बोक्याविरुद्ध सरकारतर्फे गुन्हा नोंदविला. सपोनि. पुणे तपास करीत आहेत.
(फोटो)