उद्योगांनी दिला १२,९०० कोटींचा महसूल
By Admin | Updated: May 6, 2016 23:59 IST2016-05-06T23:34:27+5:302016-05-06T23:59:04+5:30
औरंगाबाद : दुष्काळी परिस्थितीशी सामना करीत असणाऱ्या औरंगाबादेतील उद्योगांनी २०१५-१६ या आर्थिक वर्षात केंद्र व राज्य सरकारच्या तिजोरीत तब्बल १२,९०० कोटी रुपयांची महसुलाच्या रुपात भर घातली आहे.

उद्योगांनी दिला १२,९०० कोटींचा महसूल
औरंगाबाद : गेल्या चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीशी सामना करीत असणाऱ्या औरंगाबादेतील उद्योगांनी २०१५-१६ या आर्थिक वर्षात केंद्र व राज्य सरकारच्या तिजोरीत तब्बल १२,९०० कोटी रुपयांची महसुलाच्या रुपात भर घातली आहे.
गेल्या पाच वर्षांच्या म्हणजे २००८-०९ च्या तुलनेत उद्योगांनी दिलेल्या महसुलात अडीच पट वाढ झाली आहे. २००८-०९ यावर्षी उद्योगांनी ३,५१८ कोटी रुपयांचा अबकारी व सीमा शुल्क कराचा भरणा केला होता. याबरोबरच २३० कोटींचा सेवाकर, ७३८ कोटी रुपयांचा मूल्यवर्धित कर (व्हॅट), ८७८ कोटी रुपयांच्या राज्य उत्पादन शुल्काचा भरणा केला होता
. २००९-१० यावर्षी २,८८३ कोटी रुपयांचा अबकारी कर, ८९७ कोटींचा व्हॅट आणि ९४४ कोटींच्या राज्य उत्पादन शुल्कासह ४,९२३ कोटी रुपयांचा भरणा केला होता. २०१०-११ यावर्षी उद्योगांनी ७,१७० कोटी रुपयांचा महसूल दिला होता. ४,३५५ रुपयांचा अबकारी कर, १,२९६ कोटींचा व्हॅट आणि १,३१० कोटी रुपयांचा राज्य उत्पादन शुल्क आदींचा यात समावेश आहे.
गेल्या चार वर्षांपासून मराठवाड्यात सातत्याने दुष्काळ पडत आहे.
शेतीचे उत्पन्न घटल्याने उद्योगांवरच विभागाची अर्थव्यवस्था टिकून आहे. अशा परिस्थितीत महसुलात सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे. २०११-१२ यावर्षी ९,८०५ कोटी रुपये, २०१२-१३ यावर्षी ११,४७२ कोटी, २०१३-१४ यावर्षी ११,८५९ कोटी, तर २०१४-१५ यावर्षी १२,७५२ कोटींचा महसूल शासनाला मिळवून दिला होता.