सवलतींमुळे उद्योगांना मिळणार नवसंजीवनी!
By Admin | Updated: March 26, 2016 00:50 IST2016-03-26T00:39:54+5:302016-03-26T00:50:59+5:30
राजेश भिसे , जालना आगामी अर्थसंकल्पात स्टील उद्योगासाठी वीजदरात सूट देण्याची तरतूद करण्यात आल्याने जालन्यातील स्टील उद्योगाला नवसंजीवनी मिळेल,

सवलतींमुळे उद्योगांना मिळणार नवसंजीवनी!
राजेश भिसे , जालना
आगामी अर्थसंकल्पात स्टील उद्योगासाठी वीजदरात सूट देण्याची तरतूद करण्यात आल्याने जालन्यातील स्टील उद्योगाला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास उद्योजक घनश्याम गोयल यांनी लोकमत दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला.
गोयल म्हणाले की, गत काही महिन्यांपासून जालना औद्योगिक वसातीतील स्टील उद्योग डबघाईला आला होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे छत्तीसगड आणि रायपूर येथील स्टील उत्पादकांचे दर तुलनेने कमी होते. त्यामुळे जालन्यातील उद्योगांना दर कमी करणे गरजेचे ठरत होते. तर दुसरीकडे वीजदरात सूट नसल्याने या उद्योगाची अडचण निर्माण झाली होती. त्यातच मंदीची छाया आणि वाढती तीव्र स्पर्धा या पार्श्वभूमीवर अनेक आव्हाने या क्षेत्रात निर्माण झाले होते. जालना औद्योगिक वसाहतीत जवळपास छोट्या मोठ्या ५५ स्टील उत्पादन करणाऱ्या स्टील कंपन्या बंद सुरू होत्या. वाढती स्पर्धा आणि महाग असलेली वीज यामुळे जवळपास ४५ कंपन्या तग धरु शकल्या नाहीत. केवळ १४ मोठे प्रकल्प सद्यस्थितीत सुरू आहेत. परिणामी बेरोजगारीचे प्रमाण वाढले होते. वीजदरात सूट देण्याची मागणी अनेकवेळा उद्योजकांनी सरकारकडे केली. जालन्यातून मुंबईसाठी जनशताब्दी सुरू करण्यात आली. तेव्हा उद्योजकांच्या शिष्टमंडळाने भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन वीज दरात सूट देण्याची मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री जानेवारीत जालना दौऱ्यावर आले असताना त्यांनी व्यापाऱ्यांसाठी विशेष परिषद घेऊन सरकार उद्योग जगतासाठी काय करीत आहे, याची माहिती दिली. तसेच वीज दरात सूट देण्याबाबत सकारात्मक विचार करुन आगामी अर्थसंकल्पात यादृष्टिने निधीची तरतूद करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले होते. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील उद्योगांना वीजदरात सूट देण्याबाबत अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन केली होती.
या समितीने नुकताच आपला अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता. याचा सर्वांकष अभ्यास करुन मुख्यमंत्री फडणवीस यांनी आगामी अर्थसंकल्पात वीजदरात सूट देण्याचा निर्णय घेतला आणि विविध सवलतींसाठी तब्बल एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एकूणच या निर्णयामुळे स्टील उद्योगाला पुन्हा उभे राहण्याची संधी मिळाल्याचे गोयल म्हणाले.
जालना औद्योगिक वसाहतीत जवळपास छोट्या मोठ्या ५५ स्टील उत्पादन करणाऱ्या कंपन्या बंद सुरू होत्या. वाढती स्पर्धा आणि महाग असलेली वीज यामुळे जवळपास ४५ कंपन्या तग धरु शकल्या नाहीत. त्यामुळे त्या बंद झाल्या. केवळ १४ मोठे प्रकल्प सद्यस्थितीत सुरू आहेत.
४सध्या दुष्काळाचे सावट असल्याने बांधकाम क्षेत्रात स्थिर वातावरण आहे. मात्र, वीजदरात सूट मिळाल्याने तुलनेने दर कमी होण्यास मदत होईल.
४ज्यामुळे इतर ठिकाणच्या स्टील उत्पादनांशी स्पर्धा करणे या उद्योगांना आता शक्य होणार आहे. तसेच जालना औद्योगिक वसाहतीत बंद पडलेल्या जवळपास ५० टक्के कंपन्या पुन्हा सुरू होऊन रोजगारही वाढतील, असा आशावाद गोयल यांनी व्यक्त केला.