शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गालगत १८ ठिकाणी होणार इंडस्ट्रियल टाऊनशिप; पहिला टप्पा मराठवाड्यात

By बापू सोळुंके | Updated: December 10, 2024 18:51 IST

पहिल्या टप्प्यात मराठवाड्यात चार इंडस्ट्रियल टाऊनशिप उभारण्यात आला आहे

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गालगत १८ इंडस्ट्रियल टाऊनशिप उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात चार टाऊनशिप उभारण्यात येत असून, या सर्व जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतील आहेत. प्रस्तावित टाऊनशिपच्या जागांची पाहणी नुकतीच एमआयडीसी आणि एमएसआरडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने केली.

ऑरिक सिटीच्या दिल्ली, मुंबई औद्योगिक पार्कला समृद्धी महामार्गाची कनेक्टिव्हिटी देण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. औद्योगिक वसाहतींमधील तयार माल विदेशात पाठविणे आणि विदेशातून कच्चा माल औद्योगिक वसाहतीपर्यंत पोहोचविण्यासाठी समृद्धी महामार्ग महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. ही बाब लक्षात घेऊन समृद्धी महामार्गालगत १८ ठिकाणी इंडस्ट्रियल टाऊनशिप शासनाने प्रस्तावित केल्या आहेत. नवीन सरकार आल्यामुळे पहिल्या टप्प्यात चार इंडस्ट्रियल टाऊनशिप छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांत उभारल्या जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हडस पिंपळगाव, लासूर, वैजापूर तालुक्यातील जांबरगाव तसेच कोपरगाव तालुक्यातील धोत्रा नोड यात वैजापूर तालुक्यातील बापतारा, पुरणगाव आणि लाखगंगा या गावांचा समावेश आहे. जालना जिल्ह्यातील देऊळगाव राजा रोडवरील जांभूळ अशा या चार इंडस्ट्रियल नोडचा समावेश आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेटछत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांतील प्रस्तावित चार इंडस्ट्रियल टाऊनशिपच्या जागांची पाहणी एमआयडीसीच्या डेप्युटी सीईओ सोनाली मुळे, प्रादेशिक अधिकारी चेतन गिरासे आणि एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने गत सप्ताहात केली. प्रत्येक साईटमध्ये ६०० ते ७०० हेक्टर जमीन घेतली जाणार आहे. यातील किती जमीन शासनाची आहे आणि किती शेतकऱ्यांकडून घ्यावी लागेल, याची माहिती घेण्यात आली.

पाण्याची व्यवस्था कशी होईल?अधिकाऱ्यांच्या पथकाने प्रस्तावित चार इंडस्ट्रियल टाऊनशिपला पाणी कोठून उपलब्ध होऊ शकते, याची शहानिशा केली. गंगापूर तालुक्यातील लासूरजवळील हडस पिंपळगाव आणि वैजापूर जांबरगाव या टाऊनशिपला जायकवाडी प्रकल्पाच्या बॅकवॉटरमधून तर धोत्रा नोडला नांदूर, मधमेश्वर प्रकल्पातून पाणी उपलब्ध होऊ शकेल, असे दिसून आले.

शेतकऱ्यांकडून दहा वर्षे भाड्याने जमीनकोणतीही औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी जमिनीची गरज असते. नवीन कायद्यानुसार शेतकऱ्यांशी थेट सौदा करून जमीन घ्यावी लागते. यावर मोठी रक्कम शासनाला खर्च करावी लागते. हा खर्च करावा लागू नये, यासाठी या टाऊनशिपमध्ये शेतकऱ्यांची जमीन दहा वर्षांसाठी भाड्याने घ्यावी आणि त्यानंतर त्यांच्या संपादित जमिनीच्या ३० टक्के क्षेत्राचा विकसित भूखंड त्यांना परत करण्याची संकल्पना असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. मात्र, याला शेतकऱ्यांकडून कितपत प्रतिसाद मिळतो, यावरच या नवीन टाऊनशिपचे भवितव्य अवलंबून आहे.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMIDCएमआयडीसी