शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादकरच बनविणार शहराला इंदूर : मनपा आयुक्तांचा विश्वास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 12:10 IST

इंदूर झाले चकाचक, औरंगाबाद का नाही ? : सध्या शहरातील अनेक वॉर्ड हळूहळू कचराकुंडीमुक्त होत आहेत. हा माझ्यासाठी खूप मोठा आशेचा किरण असल्याचे मत महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

ठळक मुद्दे इंदूर शहर कचराकुंडीमुक्त, धूलिकणमुक्त झाले. औरंगाबादेही याची सुरुवात आम्ही करीत आहोत.शहरातील लाखो नागरिकच औरंगाबादला येणाऱ्या काही दिवसांमध्ये इंदूरपेक्षा दर्जेदार शहर बनवतील.इंदूर महापालिकेने जे केले तेच औरंगाबादेतही करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे.

- मुजीब देवणीकर 

औरंगाबाद : इंदूर शहर कचराकुंडीमुक्त, धूलिकणमुक्त झाले. औरंगाबादेही याची सुरुवात आम्ही करीत आहोत. शहरातील लाखो नागरिकच औरंगाबादला येणाऱ्या काही दिवसांमध्ये इंदूरपेक्षा दर्जेदार शहर बनवतील. इंदूर महापालिकेने जे केले तेच औरंगाबादेतही करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. इंदूरप्रमाणेच महापालिकाही भौतिक सोयी-सुविधा उलब्ध करून देण्याचे काम करणार आहेत. सध्या शहरातील अनेक वॉर्ड हळूहळू कचराकुंडीमुक्त होत आहेत. हा माझ्यासाठी खूप मोठा आशेचा किरण असल्याचे मत महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाने इंदूर शहराचा सखोल अभ्यास करून ‘इंदूर स्वच्छ झाले, औरंगाबाद का नाही?’ या नावाने सलग सात दिवस वृत्तमालिका संपूर्ण राज्यात प्रसिद्ध केली. वृत्तमालिकेच्या शेवटच्या भागात औरंगाबादचे मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना ७ प्रश्न विचारण्यात आले, ते असे.

प्रश्न - मधुर वाणीच्या बळावर इंदूर मनपाने शहर स्वच्छ केले, औरंगाबादेत हे का नाही.?आयुक्त - मी इंदूरची अलीकडेच पाहणी केली आहे. तेथील दौऱ्यात बरेच काही शिकलो. इंदूरमध्ये खरोखरच मधुर वाणीच्या बळावर नागरिकांशी मनपाने संवाद साधला. यासाठी सहा वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांची मनपाने मदत घेतली. या संस्थांचे कर्मचारी प्रत्येक रिक्षासोबत हजर राहत. नागरिकांशी नम्रपणे ते संवाद साधत असतात. हाच प्रयोग औरंगाबादेतही करण्यात येणार आहे. लवकरच यासंदर्भातील निविदाही काढण्यात येईल. इंदूरप्रमाणे औरंगाबादेतही सफाई कर्मचाऱ्याला ‘सफाई मित्र’ संबोधण्यात येणार आहे. दुर्गंधीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबद्दल थोडीतरी नागरिकांनीही सहानभूती दाखवायला हवी.

( मधुर वाणी, प्रेमाच्या बळावर इंदौर स्वच्छतेत देशात नं.१; ३२ लाख नागरिकांचे पाठबळ मिळविले )

प्रश्न - इंदूर शहरातील ‘सफाई मित्र’ मनापासून काम करतात. औरंगाबादेत निव्वळ पाट्या टाकतात.?आयुक्त - इंदूरची औरंगाबादशी तुलना करणे चुकीचे आहे. तेथे ७ हजार सफाई कर्मचारी आहेत. आपल्याकडे १४०० कर्मचारी आहेत. दहा हजार नागरिकांच्या वॉर्डाला पाच ते आठ कर्मचारी आहेत. एक हजार कॉलनी आहेत. अनेक सफाई कर्मचाऱ्यांनी बदली मजूर ठेवले आहेत. आता आपण बायोमेट्रिक पद्धत सुरू करून बदली कामगार ही संकल्पनाच संपवून टाकणार आहोत. नागरिकांमध्येही जनजागृती व्हावी म्हणून चार वेगवेगळ्या खाजगी संस्था शहरात रात्रंदिवस काम करीत आहेत. घरोघरी जाऊन कचरा जमा करण्याचे काम खाजगी एजन्सीला दिल्यावर या कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण हलका होईल. त्यानंतर कामात दर्जेदारपणा येईल.

( शहर साफसफाईसाठी अधिकारी- कर्मचाऱ्यांनी दिले झोकून )

प्रश्न - इंदूर मनपा दरवर्षी स्वच्छतेवर १५२ कोटी खर्च करते, औरंगाबादमध्ये ६५ कोटींहून अधिक रक्कम खर्च करून उपयोग काय?आयुक्त - घनकचरा व्यवस्थापनावर खर्च होणाऱ्या निधीची जबाबदारीही निश्चित होणे आवश्यक आहे. महापालिका ६५ कोटींहून अधिक रक्कम खर्च करते, ही वस्तुस्थिती आहे. त्यातील ४२ कोटी रुपये निव्वळ कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च होतात. उर्वरित २० ते २२ कोटी रुपये कंत्राटी पद्धत, डिझेल, पावडर खरेदीवर होतात. घरोघरी जाऊन खाजगी कंपनीने कचरा जमा करावा ही पद्धत सुरू करतोय. यामुळे सेवाही दर्जेदार मिळेल. इंदूरप्रमाणेच नागरिकांकडून सर्व्हिस चार्जही वसूल करण्यात येईल. दरवर्षी दहा कोटी रुपये यातून मिळतील, अशी अपेक्षा मी करतोय.  मोठ्या हॉटेल, व्यावसायिकदारांकडून आम्ही व्यावसायिक दरानेच वसुली करणार आहोत.  १ आॅगस्टपासून कचरा रस्त्यावर टाकणाऱ्यांना दंड आकारतोय. यासाठी माजी सैनिक, एसपीओ यांची मदत घेण्याचा विचार सुरू आहे.

( इंदूरमध्ये शहर स्वच्छतेवर दरवर्षी १५२ कोटी खर्च )

प्रश्न - इंदूर शहर स्वच्छ, धूळमुक्त झाल्याने दरवर्षी २५ कोटींनी औषधांची विक्री घटली. हा चमत्कार शहरात होईल का?आयुक्त - शहरात तुम्हाला कुठेच घाण, दुर्गंधी नसल्यास आपोआपच रोगराई थांबणार आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढणार नाही. साथ रोगांची लागण होणार नाही. कचराच ठिकठिकाणी नसेल तर कुत्र्यांची संख्याही कमी होईल. धूळ नष्ट करण्यासाठी इंदूर पॅटर्नप्रमाणेच स्वतंत्र मशीन खरेदी करण्यात येतील. नियोजित आराखड्यात याचा प्रामुख्याने समावेश केला आहे. घनकचरा विभाग अधिक सक्षम करण्यासाठी अधिक कर्मचारी, अधिकारी नेमण्यात येत आहेत. शहर लवकरच स्वच्छ होणार असल्याचे स्वप्न औरंगाबादकरांनी बघायला अजिबात हरकत नाही. 

( स्वच्छतेमुळे २५ कोटींनी औषधींची विक्री घटली )

प्रश्न - इंदूरचे मनीषसिंह यांच्यासारखी दबंग अधिकाऱ्याची भूमिका आपण बजावणार का?आयुक्त - मी प्रेमाने जग जिंकण्यावर विश्वास ठेवतो. कोणतेही काम प्रेमाने सहज होऊ शकते. त्यासाठी कायद्याचा बडगा उगारणे योग्य नाही. शहरातील रस्ते रुंद करणे, गुळगुळीत करणे हे आमच्या अजेंड्यावर आहे. अगोदर शासनाने दिलेला निधी खर्च केल्यावर प्लॅन बी शासनाला सादर करून निधीची मागणी करण्यात येईल.

( ‘दबंग’ अधिकाऱ्याने केला इंदूरचा शहराचा कायापालट )

प्रश्न - इंदूरचा कायापालट करण्यात ‘इको प्रो’या एजन्सीची मुख्य भूमिका होती. हीच एजन्सी औरंगाबादसाठी नेमली आहे. तरीही...?आयुक्त - इको प्रो एजन्सीचे इंदूर हे स्वत:चे शहर आहे. त्यासाठी त्यांनी दिवसरात्र मेहनत घेतली. औरंगाबादेतही ते आपल्याला खूप मदत करीत आहेत. नॉलेज लिंक, अ‍ॅक्शन फॉर बेटर सोसायटीसह आणखी दोन जण शहरात खूप चांगले काम करीत आहेत.

( इंदूर स्वच्छ झाले; कारण टक्केवारी नव्हती  )

प्रश्न - इंदूरप्रमाणे स्वच्छ नाले, बसथांबे, शौचालये, दर्जेदार पाणी या सुविधा औरंगाबादकरांना कधी मिळणार?आयुक्त - शहरात खाजगी तत्त्वावर त्यातही महिला शौचालयांची संख्या भविष्यात मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येणार आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत अत्याधुनिक बसथांबे लवकरच पाहायला मिळतील. शहरातील दूषित पाणी नाल्यांमध्ये जाणार नाही, याचा आढावा घेण्यात येत आहे. नाल्यांमध्ये कचरा टाकणे, त्यावरील अतिक्रमणे काढणे हा मोठा विषय आहे. येणाऱ्या वर्षभरात पाण्यासह अनेक दर्जेदार सोयीसुविधा मिळतील.

( वाहता नाला झाला नदीसारखा आरस्पानी )

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान