इंदूरमध्ये शहर स्वच्छतेवर दरवर्षी १५२ कोटी खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 02:00 AM2018-07-27T02:00:07+5:302018-07-27T02:02:16+5:30

१,१०० टन कचरा : शंभर टक्के प्रक्रिया, कॅरिबॅगपासून डस्टबीन, सीएनजी गॅसनिर्मिती

In Indore, the expenditure on sanitation of the city is 152 crores annually | इंदूरमध्ये शहर स्वच्छतेवर दरवर्षी १५२ कोटी खर्च

इंदूरमध्ये शहर स्वच्छतेवर दरवर्षी १५२ कोटी खर्च

googlenewsNext

- मुजीब देवणीकर 

औरंगाबाद : इंदूर शहराच्या साफसफाईवर महापालिका दरवर्षी १५२ कोटी रुपये खर्च करते. शहरातील ३२ लाख नागरिक कचरा संकलनासाठी दररोज दोन रुपये देतात. ३० कोटी रुपये साफसफाईचा भार सर्वसामान्य नागरिक उचलतात. शहरात दररोज १,१०० मेट्रिक टन कचरा जमा होतो. त्यावर शंभर टक्केप्रक्रिया करून खतनिर्मिती करण्यात येते. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी मनपाने
१५० कोटींची अत्याधुनिक यंत्रणा उभारली आहे.
इंदूरच्या देवपुरिया भागात पूर्वी कचºयाचा डोंगर साचला होता. या कचºयावर प्रक्रिया करून मनपाने स्वतंत्र अत्याधुनिक यंत्रणेचे केंद्र उभारले. दिवसभरात जमा होणाºया १,१०० मेट्रिक टन कचºयापासून यशस्वीपणे खतनिर्मिती करण्यात येते. पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या आनंदाने हे खत ३ रुपये किलो दराने ५० किलोची बॅग खरेदी करतात.
इंदूर शहरातील ८५ वॉर्डांचा कचरा मनपा ८ ट्रान्स्फर सेंटरवर जमा करते. तेथून तो देवपुरिया येथे प्रक्रियेसाठी नेण्यात येतो. याशिवाय बांधकाम साहित्यासाठी दोन स्वतंत्र ट्रान्स्फर सेंटर आहेत. बांधकाम साहित्यापासून विटा, पेव्हरब्लॉक तयार करण्याचे कामही मनपा करते. शहरातील प्रत्येक फूटपाथवर मनपाने तयार केलेले पेव्हरब्लॉक वापरण्यात येतात. शहरातील बांधकाम साहित्य उचलण्यासाठी मनपा संबंधित नागरिक, बिल्डरला आर्थिक दंड आकारते. विशेष बाब म्हणजे कचरा उचलणे, त्यावर प्रक्रिया करणे, बांधकाम साहित्यापासून विटा, पेव्हरब्लॉक तयार करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अत्यंत खुबीने वापर करण्यात आला आहे. हे वैभव मनपाने उभारल्याचे पाहत आपण भारतात आहोत का? असा प्रश्न पडतो.

कचरा वेचकांना रोजगार
देवपुरिया भागात सुका कचरा वेगळा टाकण्यात येतो. येथे ४३३ कचरा वेचक येतात. त्यांना येण्या-जाण्यासाठी मनपाने स्वतंत्र दोन बस दिल्या आहेत. एक कचरा वेचक दिवसभरातून कॅरिबॅग, पत्रा, लोखंड, प्लास्टिक आदी साहित्य वेगळा करतात. जागेवरच त्याने वेचलेले साहित्य एक व्यापारी खरेदी करतो. एका कचरा वेचकाला दिवसभरातून पाचशे ते सहाशे रुपये मिळतात. शहरातील कचराकुंड्यांवर भटकंतीची वेळ वेचकांवर येत नाही, असे कार्यकारी अभियंता पी.एस. खुसवा यांनी सांगितले. शहरातून जमा होणारे सॅनेटरी नॅपकिन, डायपर यावरही स्वतंत्र यंत्रणेद्वारा प्रक्रिया करण्याचे तंत्रज्ञान मनपाने उभारले आहे.

सीएनजी गॅस : इंदूर शहरातील सर्वात मोठ्या भाजीमंडईच्या बाजूला महिंद्रा कंपनीच्या सहकार्याने सीएनजी प्लँट उभारला आहे. भाजीमंडईतील कचºयापासून दररोज ८०० टन सीएनजी गॅस तयार करण्यात येतो. या गॅसवर मनपाच्या आठ बसेस चालतात. कंपनी मनपाला ५३ रुपये किलो दराने गॅस विकते. या प्रकल्पात मनपाचे ७ कोटीची, कंपनीची अडीच कोटींची गुंतवणूक असल्याचे प्रकल्प मॅनेजर व्यंकटकृष्ण किशोर यांनी सांगितले.

कॅरिबॅगपासून डस्टबीन
महापालिका कॅरिबॅगपासून डस्टबिन तयार करते. हे काम स्वत: महापालिका करते. कॅरिबॅग जाळून प्लास्टिकचे गोळे तयार करण्यात येतात. प्लास्टिक पाईप तयार करण्यासाठी या गोळ्यांना बरीच मागणी आहे. मनपाकडून तयार करण्यात येणारे डस्टबिन नागरिकांना मोफत देण्यात येतात, हे विशेष.

गार्डन वेस्टसाठी प्लँट : शहरातील झाडांच्या फांद्या, पालापाचोळा, मनपाच्या सर्व उद्यानांमधील पालापाचोळा एकत्र करून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी दोन कोटी रुपयांचा स्वतंत्र प्लँट उभारला आहे. येथेही खतनिर्मिती करून हे खत मनपाच्याच उद्यानांसाठी वापरण्यात येते.

Web Title: In Indore, the expenditure on sanitation of the city is 152 crores annually

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.