नुकसान भरपाईचे आदेश
By Admin | Updated: May 12, 2014 00:01 IST2014-05-11T23:45:39+5:302014-05-12T00:01:57+5:30
हिंगोली : वृद्धास कुर्हाडीसह दगडाने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी दोषी ठरवून न्यायालयाने ९ पैकी ३ आरोपींना जखमीस ४ हजार ५00 रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.

नुकसान भरपाईचे आदेश
हिंगोली : विहिरीचे पाणी नेण्याच्या कारणावरून वृद्धास कुर्हाडीसह दगडाने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी दोषी ठरवून न्यायालयाने ९ पैकी ३ आरोपींना जखमीस प्रत्येकी १५00 रुपये असे एकुण ४ हजार ५00 रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. सेनगाव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अ.दि. जवळकार यांनी ९ मे रोजी हा निकाल दिला. सेनगाव तालुक्यातील सुरजखेडा येथे ८ मे २00७ रोजी महादेव पुंजाजी मोरे (वय ६0) यांना ह्यतुझी पत्नी आमच्या विहिरीचे पाणी का नेते?ह्ण असे म्हणून नऊ जणांनी कुर्हाड व दगडाने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. याबाबत महादेव मोरे यांचे नातेवाईक सुनील किशन मोरे यांनी गोरेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून आरोपी गोरखनाथ सखाराम खिल्लारे, निंबाजी गणपत खिल्लारे, मच्छिंद्र सखाराम खिल्लारे, विलास काशिराम खिल्लारे (चौघे रा. आडगाव ता.जि. वाशिम), उत्तम रामजी जाधव, रामजी नामाजी जाधव, तातेराव रामजी जाधव, अरुण तातेराव जाधव, मनोहर कोंडबा भिसे (सर्व रा. सुरजखेडा ता. सेनगाव) यांच्याविरुद्ध गोरेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी गुन्हय़ाचा तपास करून आरोपींना अटक केली व त्यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हा खटला सेनगाव येथील न्यायालयात चालला. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे मोतीराम कुंडलिक मोरे, अर्जुन धोंडूजी मोरे, गजानन कांताराव मोरे, धम्मराज कुंडलिक मोरे, महादेव पुंजाजी मोरे (सर्व रा. सुरजखेडा) या सहा जणांची साक्ष नोंदविण्यात आली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अ.दि. जवळकार यांनी साक्षपुरावे तपासून दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर ९ मे रोजी या खटल्याचा निकाल दिला. या खटल्यातील आरोपी उत्तम रामजी जाधव, तातेराव रामजी जाधव, मनोहर कोंडबा भिसे (रा. सुरजखेडा) यांना न्यायालयाने दोन वर्षांच्या चांगल्या वागणुकीच्या बंद पत्रावर सोडले असून जखमी महादेव मोरे यास त्यांनी प्रत्येकी १ हजार ५00 रुपये या प्रमाणे ४ हजार ५00 रुपये नुकसान भरपाई म्हणून द्यावी, असा आदेश देण्यात आला आहे. इतर सहा आरोपींची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता अँड. शारदा भट्ट यांनी काम पाहिले.