बाजारसावंगी परिसरात तूर, सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:05 IST2021-06-28T04:05:21+5:302021-06-28T04:05:21+5:30

बाजारसावंगी परिसरातील गावांत यापूर्वी कापूस व मका ही दोन पिके मोठ्या प्रमाणात घेतली जात होती. ...

Increase in sowing area of tur and soybean in Bazarsawangi area | बाजारसावंगी परिसरात तूर, सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात वाढ

बाजारसावंगी परिसरात तूर, सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात वाढ

बाजारसावंगी परिसरातील गावांत यापूर्वी कापूस व मका ही दोन पिके मोठ्या प्रमाणात घेतली जात होती. कापसाचे होणारे उत्पादन व न होणारी भाववाढ तसेच कापूस पिकाच्या लागवडीपासून ते पऱ्हाट्या उपटणीपर्यंतचा खर्च यात ताळमेळ बसत नसल्यामुळे कापूस पीक हे तोट्याचे ठरत होते. तसेच बोंडअळी कापसाची वेचणीवेळी मजूर न मिळणे, यामुळेही शेतकरी मेटाकुटीला येत होते. तसेच मका पिकावर लष्करीचा प्रादुर्भाव, वाढलेला खर्च, त्यात भावामधील चढउतार यामुळे मका पिकही काही वर्षांपासून तोट्याचे ठरत गेले. यामुळे यंदा शेतकरी तूर व सोयाबीन पेरणीकडे वळाले आहेत. तुरीला मिळणारा दर तसेच सोयाबीन हे कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे पीक असल्याने यंदा तूर, सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे.

Web Title: Increase in sowing area of tur and soybean in Bazarsawangi area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.