सोयाबीन बियाणाच्या दरात प्रतिक्विंटल ३ हजारांची वाढ
By Admin | Updated: June 6, 2014 01:07 IST2014-06-06T00:11:58+5:302014-06-06T01:07:45+5:30
नांदेड : अधिच गारपीट व अवकाळी पावसाने त्रस्त झालेल्या शेतकर्यांपुढे बी-बियाणाच्या दरवाढीचे संकट उभे राहिले असून

सोयाबीन बियाणाच्या दरात प्रतिक्विंटल ३ हजारांची वाढ
नांदेड : अधिच गारपीट व अवकाळी पावसाने त्रस्त झालेल्या शेतकर्यांपुढे बी-बियाणाच्या दरवाढीचे संकट उभे राहिले असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीन बियाणाच्या दरात प्रतिक्विंटल ३ हजार रुपयांची वाढ झाली आहे.
गतवर्षी सोयाबीनचे बियाणे ५८०० ते ६ हजार रुपये प्रतिक्विंटल होते. मात्र यंदा ९ हजार रुपयावर पोहचले आहे. यामुळे शेतकरी बियाणाची खरेदी करतांना मेटाकुटीला येत आहे. धानाच्या किंमती ४५०० रुपयावरुन ६ हजार रुपयावर पोहचल्या.याशिवाय खताच्या किंमतीही वाढल्याने शेतकर्यांना भाववाढीचा जबर फटका सोसावा लागणार आहे.
अवेळी पडलेल्या पावासामुळे सोयाबीन, तुर व धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सोयाबीनला शेतातच अंकुर फुटून सोयाबीन काळे पडले. परिणामी बाजारात चांगल्या दर्जाच्या सोयाबीनचे उत्पादन कमी झाल्याने यावर्षी बियाणाच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे.
गतवर्षीचे सोयाबीनचे दर असे- १८०० ते १८५० (प्रति ३० किलो)होते. परंतु यावर्षी त्यात दीडपटीने वाढ झालेली आहे.
या वर्षी सोयाबीनचे दर २३८५ ते २७०० रुपये (प्रति ३० किलो) याप्रमाणे दर आहेत. यंदा बाजारात चांगल्या दर्जाचे सोयाबीन अल्प प्रमाणात आल्यामुळे बियाणाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्या तुलनेत यंदा कापूस बियाणाच्या दरात वाढ झालेली नाही. यामुळे एका सोयाबीन बियाणाच्या बॅगची खरेदी करण्यासाठी लागणार्या पैशामध्ये कापसाचे तीन पाकिटे येतात.यामुळे वाढत्या दरवाढीमुळे शेतकरी कापूस या पिकाकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बियाणाचे दर असे- सोयाबीन-जुने दर ५८००-६००० प्रतिक्विंटल, ७९५०, धान ४५००, ६०००, तूर ९२००, १० हजार, कापूस ९५०, ९५० (प्रति पाकिट), खताचे दर- १०.२६.२६ १०९५, १०९७, डीएपी ११८१, १२६०, २०.२०.०० ७६९, ९४५, एमओपी ८४०, ८४० एसएसपी ३९५, ३९५, युरिया २८०, २८४, १५.१५.१५ ७७८, ७८० याप्रमाणे दर आहेत. (प्रतिनिधी)