शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
3
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
5
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
6
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
7
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
8
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
9
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
10
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
11
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
12
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
13
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
14
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
15
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
16
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
17
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
18
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
19
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
Daily Top 2Weekly Top 5

सौरऊर्जा प्रकल्प ते कनेक्टिव्हिटीत वाढ; मराठवाड्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महत्वपूर्ण घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 11:01 IST

Marathwada Mukti Sangram Din : मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते पैठण येथील संतपीठाचे (Sant Peeth) ऑनलाईन लोकार्पण

औरंगाबादमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त (Marathwada Mukti Sangram Din) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सिद्धार्थ उद्यानातील हुतात्मा स्मृतिस्तंभास अभिवादन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्याच्या विकासासाठी अनेक घोषणा केल्या. तसेच मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते पैठण येथील संतपीठाचे (Sant Peeth) ऑनलाईन लोकार्पण पार पडले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली पैठण येथील संतपीठ पाच अभ्यासक्रमासह सुरू होत आहे. लोकार्पण प्रसंगी मुख्यमंत्री ठाकरे यांनी हे मोठे विद्यापीठ व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी पालकमंत्री सुभाष देसाई, केंद्रीय अर्थमंत्री भागवत कराड, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खा. इम्तियाज जलील आदींची उपस्थिती होती.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आगमन होताच त्यांचे उपहात्मक स्वागत करण्यासाठी विमानतळावर गेलेल्या एमआयएम कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. तसेच मुख्यमंत्री  ठाकरे यांचा ताफा अडविण्याचा इशारा देणारे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक पोलिसांनी ताब्यात घेतले. कलम 154 अन्वये रात्री ही कारवाई  केली.

मराठवाड्याच्या विकासासाठी :- मराठवाड्यात 200 मेगा व्हॉल्टचा सौरऊर्जेचा प्रकल्प -औरंगाबादमध्ये दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारणार- औरंगाबाद - शिर्डी या  112.40 किमी मार्गाची श्रेणीवाढ करण्यात येणार-  समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या 194.48 किमीच्या जालना- नांदेड महामार्गाला गती देणार- औरंगाबाद सफारी पार्क जगातले वैशिष्ट्यपूर्ण करणार- मराठवाड्यातील 150 निजामकालीन शाळांचा पुनर्विकास करणार- हिंगोली येथे दिव्यांग पुनर्वसन केंद्रासाठी 6 कोटी निधी- औरंगाबाद -अहमदनगर रेल्वे मार्गाला चालना- औरंगाबाद - शिर्डी हवाई सेवेची चाचपणी- सातारा-देवळाई भागात भूमिगत मलनि:सारणासाठी 382 कोटी रुपये- औरंगाबाद : मुख्य रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी 317. 22 कोटी रुपये निधी नगरोत्थानमधून-परभणी शहरात भूयारी गटार योजनेच्या कामासही गती. 350  कोटी रुपयांची तरतूद- परभणीसाठी जल जीवन अभियानातून अतिरिक्त पाणी पुरवठा योजना. 105 कोटी - उस्मानाबाद शहरासाठी 168.61 कोटी रकमेची भूमीगत गटार योजना-औरंगाबाद : 1680 कोटींच्या पाणी पुरवठा प्रकल्पाचे काम वेगानं पूर्ण करण्याचे निर्देश- हिंगोली येथे हळद प्रक्रिया उद्योगासाठी4.50 कोटी- औरंगाबाद - शिर्डी या  112.40 किमी मार्गाची श्रेणीवाढ- समृद्धीला जोडणाऱ्या 194.48 किमीच्या जालना- नांदेड महामार्गाला देखील गती देणार-औरंगाबाद सफारी पार्क जगातले वैशिष्ट्यपूर्ण करणार- औरंगाबाद शहरातील गुंठेवारी नियमित करण्याची प्रक्रीया वेगाने करावी असे निर्देश-हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ मंदिर परिसराचा विकासासाठी 86.19 कोटी रुपये - नरसी नामदेव मंदिर परिसराचा विकास करण्यात येणार आहे. यासाठी 66.54 कोटी रुपये निधी - घृष्णेश्वर मंदिर सभामंडप विकास कऱण्यासाठी वाढीव २८ कोटी रुपये  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा