शहरात ९८, ग्रामीण भागांत २०१ कोरोना रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:04 IST2021-05-28T04:04:47+5:302021-05-28T04:04:47+5:30

औरंगाबाद : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या गुरुवारी तीनशेखाली आली असून, दिवसभरात २९९ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात ...

An increase of 98 corona patients in urban areas and 201 in rural areas | शहरात ९८, ग्रामीण भागांत २०१ कोरोना रुग्णांची वाढ

शहरात ९८, ग्रामीण भागांत २०१ कोरोना रुग्णांची वाढ

औरंगाबाद : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या गुरुवारी तीनशेखाली आली असून, दिवसभरात २९९ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात शहरातील ९८ तर ग्रामीण भागातील २०१ रुग्णांचा समावेश आहे. गेल्या २४ तासांत १५ रुग्णांचा मृत्यू झाला. यात औरंगाबाद जिल्ह्यातील १२ रुग्णांचा आणि अन्य जिल्ह्यातील ३ रुग्णांचा समावेश आहे. मृत्यू पावलेल्या शहरातील सईदा काॅलनीतील रुग्णास कोरोनासह म्युकरमायकोसिसचे निदान झाले होते. जिल्ह्यात सध्या ४ हजार ६१० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४१ हजार ७५० एवढी झाली आहे. आतापर्यंत १ लाख ३४ हजार ५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,१३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील १६० आणि ग्रामीण भागातील ३८८ अशा ५४८ रुग्णांना सुटी देण्यात आली. सईदा काॅलनीतील ५६ वर्षीय पुरुषाला २६ मे रोजी उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले होते. परंतु घाटीत दाखल केल्यानंतर त्याच दिवशी दुपारी २ वाजता रुग्णाचा मृत्यू झाला. कोरोनासह सहविकृती म्हणून म्युकरमायकोसिस निदान करण्यात आले होते. तसेच उपचार सुरू असताना हर्सूल येथील ७० वर्षीय पुरुष, गाढेपिंपळगाव येथील ३० वर्षीय पुरुष, संग्रामनगर, सातारा परिसर येथील ६७ वर्षीय पुरुष, पानवी बुद्रुक, वैजापूर येथील ७५ वर्षीय महिला, गंगापूर येथील ७३ वर्षीय पुरुष, फुलंब्री येथील ६३ वर्षीय महिला, शनीदेवगाव, वैजापूर येथील ५३ वर्षीय पुरुष, कॅनाॅट प्लेस परिसरातील ५३ वर्षीय महिला, शिवाजीनगरातील ७० वर्षीय महिला, एन-८ येथील ८२ वर्षीय पुरुष, मिटमिटा येथील ६५ वर्षीय पुरुष आणि अहमदनगर जिल्ह्यातील ४७ वर्षीय पुरुष, ७४ वर्षीय महिला, ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण

वाघ टावर १, बेगमपूरा १, नवजीवन कॉलनी १, ज्योतीनगर १, शिवाजीनगर ५, सुतगिरणी चौक २, सिडको ६, विठ्ठलनगर १, जयभवानीनगर १, एस. टी. कॉलनी २, मुकुंदनगर १, हनुमाननगर ३, जवाहर कॉलनी १, बीड बायपास १, साफल्यनगर १, राधास्वामी कॉलनी १, आलोकनगर १, देवळाई परिसर १, गुलमोहर कॉलनी २, गजानननगर १, म्हाडा कॉलनी १, एन-९ येथे १, राजाबाजार १, कटकट गेट २, चिकलठाणा १, टी.व्ही. सेंटर १, अन्य ५५.

ग्रामीण भागातील रुग्ण

पैठण १, करोडी १, कन्नड १, सावंगी १, टाकळी १, सिल्लोड १, बजाजनगर ६, रांजणगाव २, सिडकोमहानगर १, वाळुजमहानगर २, वाळुज एमआयडीसी १, जांबाळा १, अन्य १८२.

Web Title: An increase of 98 corona patients in urban areas and 201 in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.