५७ रुग्णांची वाढ, १३८ रुग्णांना सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:26 IST2020-12-17T04:26:41+5:302020-12-17T04:26:41+5:30

औरंगाबाद : जिल्ह्यात शनिवारी कोरोनाच्या ५७ रुग्णांची भर पडली, तर उपचार पूर्ण झालेल्या १३८ रुग्णांना सुटी देण्यात आली. तसेच ...

Increase of 57 patients, discharge to 138 patients | ५७ रुग्णांची वाढ, १३८ रुग्णांना सुटी

५७ रुग्णांची वाढ, १३८ रुग्णांना सुटी

औरंगाबाद : जिल्ह्यात शनिवारी कोरोनाच्या ५७ रुग्णांची भर पडली, तर उपचार पूर्ण झालेल्या १३८ रुग्णांना सुटी देण्यात आली. तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील २ आणि अन्य जिल्ह्यातील एका रुग्णाचा शनिवारी मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.

जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४४,३०७ एवढी झाली आहे. यातील ४२,५१२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत, तर १,१६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ६२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ५७ रुग्णांत मनपा हद्दीतील ४५, ग्रामीण भागातील १२ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील १२५ आणि ग्रामीण भागातील १३ अशा १३८ रुग्णांना शनिवारी सुटी देण्यात आली. गंगापूर तालुक्यातील शहापूर घोडेगावातील ५८ वर्षीय पुरुष , एन -४, सिडकोतील ७४ वर्षीय पुरुष कोरोनाबाधित आणि बुलढाणा जिल्ह्यातील ४५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण

एन - ४, विवेकानंदनगर १, गणेशनगर सो., एन -८ येथे १ , जाधववाडी १, पडेगाव १, सहानीनगर २, नवजीवन कॉलनी १, एन-९, हडको १, एन-२, ठाकरेनगर २, संजयनगर १, सिडको बसस्टँड परिसर १, बसय्यैनगर १, म्हाडा कॉलनी, रिलायन्स मॉल जवळ १, टीव्ही सेंटर १, पैठण रोड १, अन्य २९

ग्रामीण भागातील रुग्ण

ऑरेंज प्राइड, वाळूज २, विष्णूनगर, कन्नड १, बजाजनगर १, अन्य ८. .

Web Title: Increase of 57 patients, discharge to 138 patients