जिल्ह्यात ३० कोरोना रुग्णांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:22 IST2021-02-05T04:22:30+5:302021-02-05T04:22:30+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यात शनिवारी कोरोनामुक्त आणि नवीन रुग्णांची संख्या सारखीच राहिली. दिवसभरात ३० कोरोना रुग्णांची भर पडली, तर ३० ...

जिल्ह्यात ३० कोरोना रुग्णांची वाढ
औरंगाबाद : जिल्ह्यात शनिवारी कोरोनामुक्त आणि नवीन रुग्णांची संख्या सारखीच राहिली. दिवसभरात ३० कोरोना रुग्णांची भर पडली, तर ३० जण कोरोनामुक्त झाले, तसेच उपचार सुरू असताना एका रुग्णाचा मृत्यू झाला.
जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४६ हजार ९५४ झाली आहे, तर आतापर्यंत ४५ हजार ६०८ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, एक हजार २३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १०९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ३० रुग्णांत मनपा हद्दीतील २१, ग्रामीण भागातील ९ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील २१ आणि ग्रामीण भागातील ९, अशा एकूण ३० रुग्णांना शनिवारी सुटी देण्यात आली. रामनगर येथील ७२ वर्षीय पुरुष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्ण
कैलासनगर १, सातारा परिसर १, प्रिया कॉलनी, पडेगाव १, गारखेडा ४, सिद्धी कॉलनी १, उल्कानगरी १, एन सात, अयोध्यानगर १, पिसादेवी १, एसआरपीएफ कॅम्प १, विठ्ठलनगर, देवळाई १, अन्य ५, साक्षीनगरी १, एसबी कॉलनी १, वेदांतनगर १
ग्रामीण भागातील रुग्ण
पोखरी १, अन्य ८