जिल्ह्यात २४ कोरोना रुग्णांची वाढ, २ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:04 IST2021-09-07T04:04:01+5:302021-09-07T04:04:01+5:30

औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात मनपा हद्दीत ७ आणि ग्रामीण भागात १७ अशा २४ कोरोना रुग्णांची वाढ झाली. गेल्या ...

Increase of 24 corona patients in the district, 2 deaths | जिल्ह्यात २४ कोरोना रुग्णांची वाढ, २ मृत्यू

जिल्ह्यात २४ कोरोना रुग्णांची वाढ, २ मृत्यू

औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात मनपा हद्दीत ७ आणि ग्रामीण भागात १७ अशा २४ कोरोना रुग्णांची वाढ झाली. गेल्या २४ तासात उपचार घेऊन २१ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले, तर उपचार सुरू असताना औरंगाबाद जिल्ह्यातील एका रुग्णाचा आणि जालना जिल्ह्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला.

जिल्ह्यात सध्या २११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णसंख्या १ लाख ४८ हजार १९८ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४४ हजार ४४४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३ हजार ५४३ रुग्णांचा मृत्यू झाला. मनपा हद्दीतील ८ आणि ग्रामीण भागातील १३, अशा २१ रुग्णांना सोमवारी सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना पैठण येथील ४० वर्षीय पुरुषाचा आणि परतूर, जालना येथील ७० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण

सहकारनगर एक यासह अन्य भागात सहा नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली.

ग्रामीण भागातील रुग्ण

औरंगाबाद २, वैजापूर १४, पैठण १.

Web Title: Increase of 24 corona patients in the district, 2 deaths