औरंगाबादमध्ये कोरोनाच्या 146 रुग्णांची वाढ, सक्रिय रुग्णसंख्या 802 वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 14:39 IST2020-11-25T14:38:29+5:302020-11-25T14:39:42+5:30
घाटी रुग्णालयात रांजणगाव शेणपुंजी येथील ७० वर्षीय पुरुष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

औरंगाबादमध्ये कोरोनाच्या 146 रुग्णांची वाढ, सक्रिय रुग्णसंख्या 802 वर
औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी १४६ नवीन रुग्णांची भर पडली. मनपा हद्दीतील १२१ रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या ८०२ पर्यंत पोहोचली आहे.
जिल्ह्यात मंगळवारी ११० जणांना (मनपा ९८, ग्रामीण १२) सुटी देण्यात आली. आजपर्यंत ४०,७०७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४२ हजार ६४६ झाली आहे. आतापर्यंत ११३७ जणांचा मृत्यू झाला असून, ८०२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. घाटीत रांजणगाव शेणपुंजी येथील ७० वर्षीय पुरुष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
ग्रामीण सापडलेले रुग्ण
वडगाव (१), सिल्लोड (१), लासूर स्टेशन (१), अन्य (१९).
मनपा हद्दीत मंगळवारी सापडलेले रुग्ण
मुकुंदवाडी (१), सारावैभव जटवाडा रोड (१), मयूर पार्क (१), शिवाजीनगर (२), पडेगाव (१), ज्योतीनगर (१), ब्ल्यू बेल कॉलनी (२), बीड बायपास (३), प्रतापनगर, उस्मानपुरा (१), दिशा संस्कृती, पैठण रोड (४), शिवशंकर कॉलनी (१), पदमपुरा (१), शाहनूरवाडी (१), दिवाण देवडी (१), सातारा परिसर (१), नक्षत्रवाडी (१), लोकमत हायकोर्ट (२), आयनॉक्स प्रोझोन (१), बजरंग कॉलनी (१), एस.बी.आय बँक, सिडको (१), ठाकरेनगर (१), बजरंग चौक (२), पार्वतीनगर (१), एन-३, सिडको (३), एन-११, नवजीवन कॉलनी (२), एन-९ श्रीकृष्णनगर (१), राजाबाजार (१), इटखेडा (१), नाथनगर (१), एस.आर.पी.एफ. कॅम्प (१), आय.जी.टी.आर. (१), विश्वभारती कॉलनी (१), सेंट फ्रान्सिस हायस्कूल (१), गादिया विहार (१), शिवज्योती कॉलनी (१), एन-११ हडको (१), अमराई (१), अन्य (७५).