औरंगाबादेत दोन बिल्डर्स, एका बियाणे उद्योगावर आयकरचे छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 00:53 IST2018-08-22T00:51:45+5:302018-08-22T00:53:24+5:30

शहरातील दोन नामांकित बांधकाम व्यावसायिक, एक बियाणे उद्योग आणि एका आॅईल मिलवर मंगळवारी आयकर विभागाने छापे टाकले. औरंगाबादसह नगर, नाशिक विभागातील आयकर अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे कारवाई केली. रात्री उशिरापर्यंत या व्यावसायिकांकडील विविध कागदपत्रांची तपासणी केली जात होती.

Income tax raids in two builders, one seed industry in Aurangabad | औरंगाबादेत दोन बिल्डर्स, एका बियाणे उद्योगावर आयकरचे छापे

औरंगाबादेत दोन बिल्डर्स, एका बियाणे उद्योगावर आयकरचे छापे

ठळक मुद्देचर्चेला उधाण : एकाचवेळी कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरातील दोन नामांकित बांधकाम व्यावसायिक, एक बियाणे उद्योग आणि एका आॅईल मिलवर मंगळवारी आयकर विभागाने छापे टाकले. औरंगाबादसह नगर, नाशिक विभागातील आयकर अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे कारवाई केली. रात्री उशिरापर्यंत या व्यावसायिकांकडील विविध कागदपत्रांची तपासणी केली जात होती.
सात ते आठ महिन्यांच्या कालावधीनंतर आयकर विभागाने पुन्हा एकदा करचुकवेगिरी विरोधात मोहीम उघडली आहे. करचुकवेगिरीच्या संशयावरून शहरातील उद्योग व बांधकाम व्यावसायिकांवर छापे टाकण्यात आले. या कारवाईसाठी नाशिक व नगर येथील अधिकारी सकाळी ८ वाजता शहरात दाखल झाले. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार सकाळी ८.३० ते ९ वाजेदरम्यान एकाच वेळी सर्व ठिकाणी छापे टाकण्यात आले. यामध्ये आयकर विभागाच्या सुमारे ४० पेक्षा अधिक अधिकाºयांचा समावेश आहे. यात व्यावसायिकांचे खरेदी-विक्रीचे व्यवहार, बँकेतील खाती, गुंतवणूक, मालमत्ता आधीची कसून तपासणी केली जात होती. या व्यावसायिकांचे व आणि कर्मचाºयांचे सर्व मोबाईल बंद ठेवण्यात आले होते. आयकर विभागाने कारवाईची माहिती संपूर्णपणे गुप्त ठेवली होती. आयकर विभागाचे अधिकारी, कर्मचाºयांनी तोंडावर बोट ठेवले होते. मात्र, या छाप्याची माहिती शहरभर पसरली आणि चर्चेला उधाण आले. ज्यांच्यावर छापे पडले नाही, अशा बांधकाम व्यावसायिकांच्या नावाची चर्चाही सुरू झाली. काही वृत्तवाहिन्यांनी ब्रेकिंग न्यूजही चालविण्यास सुरुवात केली. यामुळे अनेक बांधकाम व्यावसायिकांना याचा मानसिक त्रास सहन करावा लागला.

Web Title: Income tax raids in two builders, one seed industry in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.