३५ गावांचा राष्टÑीय पेयजल योजनेत समावेश
By Admin | Updated: May 13, 2014 01:07 IST2014-05-12T23:49:08+5:302014-05-13T01:07:32+5:30
रमेश शिंदे , औसा उन्हाळ्याची चाहुल लागली की पाणी टंचाई ही औसा तालुक्यात कायम ठरलेली असते.

३५ गावांचा राष्टÑीय पेयजल योजनेत समावेश
रमेश शिंदे , औसा उन्हाळ्याची चाहुल लागली की पाणी टंचाई ही औसा तालुक्यात कायम ठरलेली असते. ही पाणीटंचाईची तीव्रता कमी व्हावी गावातील नागरिकांची मागणी टंचाईमधून मुक्तता व्हावी म्हणून तालुक्यातील ४१ गावामध्ये पाणी पुरवठ्याची विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. भारत निर्माण, शिवकालीन पाणी पुरवठा, दलित वस्ती सुधार योजना पाणी पुरवठा योजना, राष्टÑीय ग्रामीण पेयजल अशी विविध ४१ कामांचा समावेश आणि ही सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर तालुक्यातील बर्याच गावच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मिटणार आहे. औसा तालुका हा तसा पावसाळी पाण्यावर अवलंबून असलेला तालुका आहे. तालुक्यात ना मोठ्या नद्या आहेत, ना मोठे प्रकल्प आहेत. त्यामुळे पावसाच्या पाण्यावर बरेच अवलंबून आहे. तावरजा, तेरणा आणि मसलगा प्रकल्पामधून विविध ७६ गावामध्ये प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आहेत, पण अनेक गावात पाण्यासाठी ओरड असते. उन्हाळ्याची सुरुवात झाली की बर्याच गावात पाण्यासाठी भटकंती ठरलेली असते. या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी या सर्व योजना पूर्ण झाल्यानंतर यश मिळण्याची शक्यता आहे. भारत निर्माण योजनेअंतर्गत गुळखेडा, जयनगर, चिंचोलीजोगन, धानोरा, चिंचोलीसोन, एकंबीतांडा, केंगलवाडी, बोरफळतांडा, सत्तरधरवाडी, होळी, किल्लारी, आपचुंदा, सारणी, तपसेचिंचोली, गाढवेवाडी तांडा या गावांचा समावेश असून यामधील १३ कामे पूर्ण झाली आहेत. दलित वस्ती सुधार पाणीपुरवठा योजनेमध्ये माळुंब्रा, यल्लोरी, रामेगाव, उंबडगा (खु), करजगाव, दावतपूर, उंबडगा (बु.), मातोळा, सारोळा, मासुर्डी, याकतपूर, तांबरवाडी, शिवली या गावांचा समावेश आहे. यामधील ही ७ कामे पूर्ण झाली असून ५ प्रगतीपथावर आहेत तर २ कामे रद्द करण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. शिवणीलख वाडी, सेलु, किनीथोट, बिरवली, सारोळा, येळी, एकंबीतांडा, आंदोरा, कवठाकेन, एरंडी, टेंबी, दावतपूर, महादेववाडी, वानवडा, फत्तेपूर या पंधरा गावात शिवकालीन पाणी साठवण योजनेअंतर्गत विविध कामे सुरू आहेत. ही सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर तालुक्यातील बहुतांश गावामध्ये जाणवणार्या पाणी टंचाईच्या झळा कमी होणार आहेत.