दोन महिलांवर आत्याचाराच्या घटना उघडकीस
By राम शिनगारे | Updated: May 5, 2024 21:11 IST2024-05-05T21:10:11+5:302024-05-05T21:11:46+5:30
एमआयडीसी सिडको, सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

दोन महिलांवर आत्याचाराच्या घटना उघडकीस
छत्रपती संभाजीनगर : एका महिलेला किराणा दुकानदाराने बळजबरीने ओढत नेऊन अत्याचार केले, तर दुसऱ्या घटनेत कमी पैशात फ्लॅट घेऊन देण्याचे अमिष दाखवून विवाहितेवर वारंवार अत्याचार केले. तसेच १९ लाख रुपये घेऊन फ्लॅटही दिला नसल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी सिडको, सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पहिल्या घटनेत चिकलठाणा परिसरात पिठाणी गिरणीत पीडित महिला दळण दळण्यासाठी आली होती. त्याठिकाणी आल्यानंतर आरोपी अमोल रगडे (२८) याने पीडितेसोबत बोलण्याचा प्रयत्न केला. तसेच लगट करीत होता. तेव्हा पीडिता गिरणीतुन बाहेर पडली. तेव्हा तिचा पाठलाग करीत अमोर रगडे पाठिमागे आले. त्याने पीडितेला बळजबरीने स्वत:च्याच किराणा दुकानात ओढुन नेले. त्याठिकाणी अत्याचार केल्यानंतर बदनामी करण्याची धमकी देऊ लागला. ही घटना २० मार्च रोजी दुपारी १२.३० वाजता घडल. या प्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात ४ मे रोजी गुन्हा नोंदवला आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक मनिषा हिवराळे करीत आहेत. दुसऱ्या घटना नक्षत्रवाडी परिसरात घडली आहे.
आरोपी विशाल भोमदत्त त्रिवेदी (रा. नक्षत्रवाडी) याने फिर्यादीसह तिच्या पतीचा विश्वास संपादन करीत कमी किंमतीमध्ये फ्लॅट घेऊन देतो असे आश्वासन दिले. त्यानुसार फिर्यादीकडुन १९ लाख रुपये घेतले. तसेच फ्लॅटही नावावर करून दिला नाही. उलट जिवे मारण्याची धमकी देत वारंवार बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून सातारा ठाण्यात गुन्हा नोंदवला असून, अधिक तपास उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.