वैद्यनाथ मंदिरात भरगच्च कार्यक्रम

By Admin | Updated: July 28, 2014 00:53 IST2014-07-28T00:10:10+5:302014-07-28T00:53:54+5:30

परळी : श्रावणी सोमवारच्या निमित्ताने देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या वैद्यनाथ मंदिरात भरगच्च कार्यक्रम पार पडत आहेत़ रविवारपासूनच या कार्यक्रमांना सुरुवात झाली

Incessant programs in Vaidyanath temple | वैद्यनाथ मंदिरात भरगच्च कार्यक्रम

वैद्यनाथ मंदिरात भरगच्च कार्यक्रम

परळी : श्रावणी सोमवारच्या निमित्ताने देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या वैद्यनाथ मंदिरात भरगच्च कार्यक्रम पार पडत आहेत़ रविवारपासूनच या कार्यक्रमांना सुरुवात झाली असून पहिल्या श्रावणी सोमवारी एक लाख भाविक हजेरी लावतील, अशी ट्रस्टची माहिती आहे़
मंदिराच्या पायऱ्यावर नागमोडी आगाराचे लोखंडी बॅरीकेटस् लावण्यात आले आहेत़ दर्शन सुरळीत व्हावे यासाठी तीन रांगा करण्यात येणार आहेत़ पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळाची शिवमूठ आहे़ वैद्यनाथाच्या दर्शनासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यासह राज्याबाहेरील भाविकांनी रविवारपासूनच शहरात गर्दी केली आहे़
श्री १०८ नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांचे श्रावणमास तपोनुष्ठान बेलवाडी येथे सुरु झाले़ शिवाचार्य महाराजांची शहरातून मिरवणूक काढण्यात आली़ हरिहर तीर्थात जलपूजन, रुद्राभिषेक, बिल्वार्चन, परमरहस्य पारायण, भजन, जप, शिवपाठ हे कार्यक्रम पार पडले़ सोमवारी कीर्तन, शिवपाठ कार्यक्रम होणार आहे़ तयारी पूर्ण झाल्याचे ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख यांनी सांगितले़ (वार्ताहर)

Web Title: Incessant programs in Vaidyanath temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.