गल्ली नं.१२ मधील विश्वकर्मा चौकापर्यंतच्या रस्त्याचे उद्घाटन
By Admin | Updated: July 3, 2014 00:57 IST2014-07-03T00:50:45+5:302014-07-03T00:57:11+5:30
औरंगाबाद : औरंगाबाद पूर्वचे आमदार राजेंद्र दर्डा यांच्या प्रयत्नातून उपलब्ध झालेल्या विशेष निधीतून तयार करण्यात आलेल्या वॉर्ड क्र. ८१ जयभवानीनगर येथील सिमेंट रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले.

गल्ली नं.१२ मधील विश्वकर्मा चौकापर्यंतच्या रस्त्याचे उद्घाटन
औरंगाबाद : राज्याचे शालेय शिक्षणमंत्री व औरंगाबाद पूर्वचे आमदार राजेंद्र दर्डा यांच्या प्रयत्नातून उपलब्ध झालेल्या विशेष निधीतून तयार करण्यात आलेल्या वॉर्ड क्र. ८१ जयभवानीनगर येथील गल्ली नं. १२ मधील डीपीपासून ते विश्वकर्मा चौकापर्यंतच्या सिमेंट रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले.
या भागातील नागरिकांची रस्त्याची ही मागणी पूर्ण झाल्याने व रस्ता नसल्यामुळे ज्या गैरसोयी होत होत्या, त्यातून सुटका झाल्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करीत होते. स्वत: राजेंद्र दर्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत व डोली-ताशांच्या निनादात तसेच फटाक्यांच्या आतषबाजीत झालेल्या या उद्घाटनास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.‘राजेंद्र दर्डा जिंदाबाद’ व ‘राजेंद्र दर्डा तुम आगे बढो’ अशा घोषणांनी हा सारा परिसर दणाणून गेला होता.
संदीप शिंदे, गजानन केवट, भागवत भारती, लक्ष्मण गिरी, आतिश डुकळे, शुभम नाडे, अबूभाई, सतीश गायकवाड, बाळासाहेब साळुंके, कैलास मगरे, राजू वळेकर, माधव चव्हाण, बबन वाघमोडे, पांढरेबाबा, अर्जुन कर्नळ, रामेश्वर मेरगळ, विनायक पवार, दीपक सोनवणे, सीताराम राजभर, बाळू शिंदे, पप्पू शिंदे, अभय जोशी, पंकपाळकाका, राजू डुकळे, विजय क्षीरसागर, बळीराम दौड, पंढरीनाथ धोतरे, नाना केवट, कोटेचा काका, सचिन परदेशी, उद्धव सावरे, कृष्णा बोलकर, सुनील शिंदे, सुभाष शिंदे, नीरज साखरे, विनोद मिसाळ, गजानन सोनवणे, अंकुश क्षीरसागर, शेळके पाटील, गोंडाळ पाटील, हिवाळे पाटील, चिंचोले पाटील, देवारे, गिरी, खरात, नरवडे, दुबे, रामतुज आदींसह शेकडो नागरिक या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित होते. अत्यंत तत्परतेने रस्त्याची आमची ही समस्या सोडविल्याबद्दल राजेंद्र दर्डा यांचे या नागरिकांनी विशेष आभार मानले.