‘लोकमत’च्या उदगीर विभागीय कार्यालयाचे थाटात उद्घाटन
By Admin | Updated: July 27, 2014 01:13 IST2014-07-27T00:08:06+5:302014-07-27T01:13:10+5:30
उदगीर : विश्वासार्हता हा 'लोकमत'चा बाणा असून यावरच लोकमत समाजाच्या कसोटीस उतरला आहे, असे गौरवोद्गार जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते भगवानसिंह बायस यांनी शुक्रवारी येथे काढले़
‘लोकमत’च्या उदगीर विभागीय कार्यालयाचे थाटात उद्घाटन
उदगीर : विश्वासार्हता हा 'लोकमत'चा बाणा असून यावरच लोकमत समाजाच्या कसोटीस उतरला आहे, असे गौरवोद्गार जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते भगवानसिंह बायस यांनी शुक्रवारी येथे काढले़
येथील 'लोकमत'च्या विभागीय कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़ यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आ़. सुधाकर भालेराव, नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे हे उपस्थित होते़ मंचावर 'लोकमत'चे संपादक सुधीर महाजन, सरव्यवस्थापक रमेश तावडे, जिल्हा प्रतिनिधी दत्ता थोरे, उपशाखा व्यवस्थापक नितीन खोत, माजी आ़धर्माजी सोनकवडे यांची उपस्थिती होती़
पुढे बोलताना भगवानसिंह बायस गुरूजी म्हणाले, 'लोकमत'ने मराठवाडा आवृत्ती सुरू केल्यापासून उदगीर व सामान्य वाचकांशी नाळ कायम ठेवली आहे़ पहिल्या दिवसापासून 'लोकमत'चा वाचक असलेल्या एका सामान्य वाचकाच्या हातून होणारे उद्घाटनही 'लोकमत'ने जपलेली संवेदना आहे़ या कार्यालयाच्या माध्यमातून 'लोकमत' व या भागाचे नाते अधिक घट्ट होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला़
यावेळी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे यांनी 'लोकमत' ने उदगीरच्या विकास विषयक मांडलेल्या प्रश्नाचा व त्या माध्यमातून झालेल्या विकासाचा मानकरी 'लोकमत'च असल्याचे सांगून 'लोकमत'च्या विकास विषयक तळमळीचा गौरव निटूरे यांनी केला़ आ़डॉ़सुधाकर भालेराव यांनी वृत्तपत्र हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून या क्षेत्राचे समाजातील महत्व अनन्य साधारण आहे़ ते महत्व टिकवून ठेवण्याची परंपरा 'लोकमत'ने कायम ठेवली असल्याचे ते म्हणाले़ 'लोकमत'ने सामान्यांच्या, कष्टकऱ्यांच्या व दीन-दुबळ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली़ न्याय ही मिळवून दिला असल्याचे सांगून आ़भालेराव यांनी 'लोकमत' कडून विधायकता जपली जात असल्याचे सांगितले़
यावेळी 'लोकमत'चे संपादक सुधीर महाजन यांनी या परिसराचा विकास हाच या कार्यालयाच्या स्थापनेचा उद्देश असल्याचे सांगून उदगीर, देवणी, जळकोट व सीमा भागातील प्रश्नासाठी लढणाऱ्यांच्या सोबत 'लोकमत' आहे़ जे लढतील त्यांच्या सोबत व जे लढणार नाहीत त्यांच्या विरोधातही 'लोकमत' ची विकास विषयक भूमिका असल्याचे स्पष्ट केले़ प्रास्ताविक सरव्यवस्थापक रमेश तावडे यांनी केले़ यावेळी जिल्हा प्रतिनिधी दत्ता थोरे व तालुका प्रतिनिधी व्ही़एसक़ुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले़ सूत्रसंचालन श्रीपाद सिमंतकर यांनी केले़ आभार उपव्यवस्थापक नितीन खोत यांनी मानले़