‘मिनी घाटी’च्या उद्घाटनाला आता ३० एप्रिलचा मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 13:11 IST2018-04-25T13:07:18+5:302018-04-25T13:11:54+5:30

दोन वर्षांपासून रखडलेले चिकलठाणा येथील ‘मिनी घाटी’ म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या उद््घाटनासाठी आता ३० एप्रिलचा मुहूर्त निवडण्यात आला आहे.

The inauguration of 'Mini Ghati Hospital' will now be held on April 30 | ‘मिनी घाटी’च्या उद्घाटनाला आता ३० एप्रिलचा मुहूर्त

‘मिनी घाटी’च्या उद्घाटनाला आता ३० एप्रिलचा मुहूर्त

ठळक मुद्देया रुग्णालयाच्या उद््घाटनासाठी ‘तारीख पे तारीख’ देण्याचाच खेळ गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे

औरंगाबाद : दोन वर्षांपासून रखडलेले चिकलठाणा येथील ‘मिनी घाटी’ म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या उद््घाटनासाठी आता ३० एप्रिलचा मुहूर्त निवडण्यात आला आहे. उद््घाटनादृष्टीने रुग्णालयात विविध कामकाजांची घाई केली जात आहे. 

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या उद््घाटनाची अनेक डेडलाईन हुकल्या आहेत. या रुग्णालयाच्या उद््घाटनासाठी ‘तारीख पे तारीख’ देण्याचाच खेळ गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे; परंतु काही केल्या रुग्णसेवेला मुहूर्त मिळत नाही.  ७ मार्चपर्यंत पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याची डेडलाईन असून  या मुदतीत हे रुग्णालय नक्कीच कार्यान्वित होईल, अशी माहिती जानेवारीमध्ये एका कार्यक्रमात आरोग्य उपसंचालक डॉ. विजय कं देवाड यांनी दिली होती. शिवाय पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी २५ जानेवारी रोजी सुभेदारी विश्रामगृह येथे विविध विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी सामान्य रुग्णालयाचाही आढावा घेतला. या बैठकीनंतर आता आगामी दीड महिन्यात हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू असल्याचेही सांगण्यात आले; परंतु प्रत्यक्षात यंत्रसामुग्रींअभावी रुग्णालय सुरू होणे  लांबणीवर पडले. आता ३० एप्रिल रोजी रुग्णालयाचे उद््घाटन करण्याच्या दृष्टीने कामकाजाला गती देण्यात येत आहे. 
अधिकृत तारीख जाहीर करू
याविषयी आरोग्य उपसंचालक डॉ. विजय कं देवाड म्हणाले, विभागाने अधिकृतपणे अद्याप तारीख जाहीर केलेली नाही. याविषयी काहीही  माहिती प्राप्त झालेली नाही. तारीख आली की जाहिर केली जाईल. प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले म्हणाल्या, अंतिम निर्णय घेणे बाकी आहे. कामे पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न के ले जात आहे.
 

Web Title: The inauguration of 'Mini Ghati Hospital' will now be held on April 30

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.