सूक्ष्म नियोजन प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:08 IST2021-02-05T04:08:34+5:302021-02-05T04:08:34+5:30
शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षांपासून दुष्काळाला सामोरे जावे लागत असून, परिणामी शेतीमधील पिकांची उत्पादकता घटत आहे. भूगर्भातील पाणी साठ्यावर व ...

सूक्ष्म नियोजन प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन
शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षांपासून दुष्काळाला सामोरे जावे लागत असून, परिणामी शेतीमधील पिकांची उत्पादकता घटत आहे. भूगर्भातील पाणी साठ्यावर व जमिनीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्याने शेतकऱ्यांना हवामानातील बदलास सामोरे जाण्यासाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (PoCRA) राबविण्यात येत आहे, असे उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील यांनी म्हणाले.
हा प्रकल्प सिल्लोड-सोयगाव आणि कन्नड तालुक्यांमध्ये गेल्या तीन वर्षांपासून राबविण्यात येत आहे. याअंतर्गत येणाऱ्या टप्पा दोन, टप्पा तीनच्या गावांचे लोकसहभाग या पद्धतीने सूक्ष्म नियोजन प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. गावातील शेतकरी व इतर सामाजिक घटकांमध्ये जाणीव जागृती निर्माण करणे, हवामान बदलामुळे शेतीवर होणाऱ्या परिणामांचा शास्त्रशुद्ध पद्धतीने तपशील तयार करणे, बदलत्या हवामानाच्या अनुषंगाने पाण्याचा ताळेबंद त्याच्या आधारे नैसर्गिक साधनसंपत्तीचा आणि पीक रचना व्यवस्थापन आराखडा तयार करणे, हा प्रकल्पाचा उद्देश असल्याचे कृषी अधिकारी दीपक गवळी यांनी सांगितले.
----------------
फोटो : सिल्लोड तालुक्यामध्ये लोकसहभाग या पद्धतीने सूक्ष्म नियोजन प्रक्रियेचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, उपविभागीय कृषी अधिकारी प्रबोध चव्हाण, तालुका कृषी अधिकारी दीपक गवळी यांच्या हस्ते करण्यात आले.