आय सेन्स अ‍ॅपल स्टोअर्सचे उद्घाटन

By Admin | Updated: November 5, 2016 01:31 IST2016-11-05T01:17:12+5:302016-11-05T01:31:29+5:30

औरंगाबाद : प्रोझोन मॉल येथे आय सेन्स अ‍ॅपल स्टोअर्सचे उद्घाटन शुक्रवार, ४ नोव्हेंबर रोजी थाटात पार पडले. लोकमत समूहाचे कार्यकारी संचालक करण दर्डा

Inauguration of I-Sans Apple Stores | आय सेन्स अ‍ॅपल स्टोअर्सचे उद्घाटन

आय सेन्स अ‍ॅपल स्टोअर्सचे उद्घाटन


औरंगाबाद : प्रोझोन मॉल येथे आय सेन्स अ‍ॅपल स्टोअर्सचे उद्घाटन शुक्रवार, ४ नोव्हेंबर रोजी थाटात पार पडले.
लोकमत समूहाचे कार्यकारी संचालक करण दर्डा यांच्या हस्ते या आय सेन्स अ‍ॅपल स्टोअर्सचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी हारीस हनफी, अबरार हनफी व हुजैफा हनफी, प्रोझोन मॉलचे सेंटर हेड अर्षद मोहम्मद यांची प्रमुख उपस्थिती होती. येथे अ‍ॅपलचे मॅक बुक, आयफोन फाईव्ह एस, आय फोन सिक्स, आयफोन सेव्हन व आयफोन सेव्हन प्लस हेदेखील उपलब्ध आहेत.
या अ‍ॅपल दालनात ग्राहकांना पहिल्यांदाच अ‍ॅपल फोनचे डेमो व टच अन् फिल मिळणार आहे. यावेळी करण दर्डा म्हणाले की, प्रोझोन मॉल येथे सुरू झालेले ‘आय सेन्स’ अ‍ॅपल स्टोअर्स हे मराठवाड्यातील एकमेव अ‍ॅपल स्टोअर्स आहे. यामुळे औरंगाबादकरांना अ‍ॅपलचे अत्याधुनिक आयफोन उपलब्ध झाले आहेत. नवनवीन तंत्रज्ञानाने युक्त अ‍ॅपलच्या आयफोनमुळे शहरवासीयांनाही सतत अपडेट होता येणार आहे.
यावेळी हारीस हनफी यांनी ग्राहकांना आवाहन केले की, त्यांनी या दालनास भेट देऊन येथील आकर्षक डिस्काऊंटचा लाभ घ्यावा. याप्रसंगी अ‍ॅपल कंपनीचे महाराष्ट्र राज्य प्रमुख दिव्येश शेट्टी यांची उपस्थिती होती. शहरातील विविध क्षेत्रातील नामवंतही यावेळी उपस्थित होते.

Web Title: Inauguration of I-Sans Apple Stores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.