बनकिन्होळ्यात शेतकरी ते थेट ग्राहक विक्री स्टॉलचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:08 IST2021-02-05T04:08:39+5:302021-02-05T04:08:39+5:30
संत सावता रयत बाजारामुळे शेतकर्यांना थेट ग्राहकांशी जोडायला चांगली मदत होणार आहे. शेतकर्यांना त्यांचा चांगला फायदा होणार आहे. भाजीपाला ...

बनकिन्होळ्यात शेतकरी ते थेट ग्राहक विक्री स्टॉलचे उद्घाटन
संत सावता रयत बाजारामुळे शेतकर्यांना थेट ग्राहकांशी जोडायला चांगली मदत होणार आहे. शेतकर्यांना त्यांचा चांगला फायदा होणार आहे. भाजीपाला उत्पादक शेतकरी गट व इतर गट एकत्र येऊन बाजार स्थापन करण्यासाठी येणाऱ्या अडचणी सोडवून मार्गदर्शन करण्यास कृषी विभाग सर्वतोपरी अग्रेसर असेल, असे तालुका कृषी अधिकारी दीपक गवळी म्हणाले.
यावेळी मंडळ कृषी अधिकारी प्रभाकर सपकाळ, कृषी पर्यवेक्षक रमेश गुंडीले, आत्माचे बीटीएम महालिंग कुंभार, कृषी सहाय्यक प्रवीण सानप, मानसिंग भोळे, योगिता मनसोटे, सारिका पाटील, कृषीमित्र बाबुराव ताठे, सोमीनाथ ताठे, योगेश ताठे, प्रगतशील शेतकरी बाबासाहेब फरकाडे, धोडीराम फरकाडे, अंकुश फरकाडे, आत्माराम फरकाडे, रामा फुके, रघुनाथ फरकाडे, प्रल्हाद फरकाडे, सुरेश जाधव, शिवाजी फरकाडे समस्त शेतकरी व गटातील शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना कृषी पर्यवेक्षक रमेश गुंडीले यांनी केली. आभार प्रदर्शन कृषी सहाय्यक सारिका पाटील यांनी मानले.
--------------
फोटो : बनकिन्होळा येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन व स्टॉलचे उद्घाटन करताना कृषी विभागाची टीम व शेतकरी (छाया : केशव जाधव)