बायोसीएनजी गॅस, बायोडिझेल व जैविक खत निर्मिती प्रकल्पाचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:05 IST2021-05-28T04:05:02+5:302021-05-28T04:05:02+5:30
याप्रसंगी टी. आर. पाटील, अंजली मांडवकर (महिला आघाडी शिवसेना ), सूर्यवंशी, परमानंद बायोफ्युअल ॲण्ड एनर्जी प्रा. लि.चे संस्थापक नंदकिशोर ...

बायोसीएनजी गॅस, बायोडिझेल व जैविक खत निर्मिती प्रकल्पाचे भूमिपूजन
याप्रसंगी टी. आर. पाटील, अंजली मांडवकर (महिला आघाडी शिवसेना ), सूर्यवंशी, परमानंद बायोफ्युअल ॲण्ड एनर्जी प्रा. लि.चे संस्थापक नंदकिशोर मांडवकर, नंदनवन बायोफ्युअल प्रोड्युसर कंपनीचे संचालक नितीन धुमाळ, किशोर कुकलारे, पोपट वेताळ, नानासाहेब चव्हाण, किशोर काळे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
कांडी गवत किंवा हत्ती गवत यापासून सीएनजी गॅस, बायोडिझेल व जैविक खत निर्माण होणार आहे. शेतकऱ्याला हे कांडी
गवत किंवा हत्ती गवत विनाखर्च एकरी दीड ते दोन लाखांचे उत्पन्न मिळवून देणार आहे. कंपनीमध्ये लागणारे कांडी गवत कच्चा माल हा शेतकऱ्यांकडून घेतला जाणार आहे. प्रत्येक गावातील ग्रामपंचायत कचरामुक्त करणार आहे. त्या गावातील डम्पिंग
ग्राऊंडचा व पिकाचा जैविक कचरा कंपनी आपल्या प्रकल्पासाठी वापरणार आहे. कमी वेळात स्वतःचा शेतकी व्यापार सुरू करून दीर्घकाळापर्यंत सुरक्षित उत्पन्नाची हमी दिली आहे.
या प्रकल्पाद्वारे तालुक्यात २ ते ३ हजार रोजगार निर्मिती होऊन प्रत्येक ग्रामपंचायतीत ५ ते १० उद्योजक निर्माण होतील, यासाठी माजी वायुदल अधिकारी नंदकिशोर एस. मांडवकर यांनी पुढाकार घेतला आहे. खुलताबाद तालुका सुजलाम् सुफलाम् घडवूया, असे त्यांनी सांगितले. (फोटो)