शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

संजय शिरसाटांच्या पॅनेलची विजयी घोडदौड; वडगाव-बजाजनगर ग्रापंमध्ये बहुमताकडे वाटचाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 12:49 IST

या ग्रामपंचायतीची सत्ता काबिज करण्यासाठी बंडखोर आ.संजय शिरसाट यांच्याबरोबर भाजप, मुळ शिवसेना व माजी जि.प.सदस्य रमेश गायकवाड यांची पॅनल रिंगणात होती.

वाळूज महानगर (औरंगाबाद) : वडगाव-बजाजनगर या ग्रामपंचायतीसाठी निवडणुकीसाठी आज सकाळपासून (दि.५) मतमोजणी सुरु आहे. या निवडणुकीत बंडखोर आ.संजय शिरसाट यांच्या पॅनेलची विजयी घोडदौड पाहायला मिळत आहे. आतापर्यंत घोषीत १४ पैकी ८ जागा आ. शिरसाट गटाने जिंकल्या आहेत.

या निवडणुकीत एकूण १७ जागांसाठी ७२ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडगाव-बजाजनगर ग्रामपंचायत निवडणुकीत सहा वाॅर्डांत बहुरंगी लढत होत आहे. गतवेळी शिवसेनेने १७ पैकी १६ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले होते. भाजपचे अमित चोरडिया हे एकमेव उमेदवार विजयी झाले होते. यंदाच्या निवडणुकीत आमदार संजय शिरसाट यांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेनेत दोन गट निर्माण झाले आहेत. शिवसेनेत फाटाफूट झाल्याने भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले असून, या ग्रामपंचायतीची सत्ता काबीज करण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. याचबरोबर मूळ शिवसेना व जिल्हा परिषदेचे सदस्य रमेश गायकवाड यांचेही पॅनल निवडणुकीच्या रिंगणात असल्याने रंगत वाढली. 

या ग्रामपंचायतीसाठी गुरुवारी ६० टक्के मतदान झाले होते. अंत्यत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीचे निकाल आता हाती येत असून यात आ. शिरसाट यांच्या गटाचे वर्चस्व दिसून येत आहे. सुरुवातीला जाहीर झालेल्या दोन वार्डातील ५ जागा आ.शिरसाट गटाला मिळाल्या आहेत. वार्ड क्रमांक १ मधून आ.शिरसाट गटाचे माजी उपसरपंच सुनील काळे, छाया प्रधान, पंचायत समितीचे सदस्य राजेश साळे यांच्या पत्नी सुनीता साळे हे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. 

तर वार्ड क्रमांक २ मधून आ.शिरसाट यांच्या पॅनलचे विष्णू उगले व माधुरी सोमासे यांनी विजय मिळविला आहे. या वार्डामधून विष्णु उगले यांनी माजी जि.प.सदस्य अनिल चोरडिया यांचे पुत्र व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अमित चोरडिया यांचा दारुण पराभव केला आहे. 

वार्ड क्रमांक ३ मधून आ.शिरसाट गटाच्या राणी पाटोळे, भाजपा पंचायत समिती सदस्य सतीश पाटील यांच्या पत्नी माया पाटील व मुळ शिवसेनेचे सागर शिंदे या तिघांनी बाजी मारली आहे.

वॉर्ड क्रमांक 4 मधून आ.संजय शिरसाट गटाच्या सुरेखा लगड, पूनम भोसले तर भाजप चे संभाजी चौधरी विजयी.

वॉर्ड क्रमांक 5 मधून मूळ शिवसेनेच्या कमल गरड, विजय सरकटे व मंदा भोकरे हे तीन उमेदवार विजयी.

मतमोजणी सुरुच असून आ. संजय शिरसाट यांच्या पॅनलची बहुमताकडे वाटचाल सुरु आहे.

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटAurangabadऔरंगाबादElectionनिवडणूक