शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

वाळू तस्करांचा महसूल पथकावर जीवघेणा हल्ला; जप्त ट्रॅक्टर पळवले, जीप पेटवून देण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 12:16 IST

वाळू तस्कर अनियंत्रित, डिझेल टाकून महसूल पथकाची जीप पेटविण्याचा प्रयत्न, कर्मचाऱ्यांनी कसाबसा वाचवला जीव

- श्यामकुमार पुरे

सिल्लोड: तालुक्यात वाळू तस्करांना कोणाचा धाक राहिला नसल्याचे बुधवारी पुन्हा दिसून आले. रात्री ९ वाजेच्या सुमारास दिडगाव ते उपळी रस्त्यावर महसूल पथकावर तस्करांनी दगडफेक करत हल्ला चढवत जप्त केलेले दोन वाळूचे ट्रॅक्टर पळवून नेले. इतकेच नव्हे तर महसूल पथकाचे वाहन फोडून त्यावर डिझेल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. महसूल कर्मचाऱ्यांनी कसेबसे बाहेर तेथून बाहेर पडत आपला जीव वाचवला. या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी बुधवारी रात्री २ वाजता ४ वाळू तस्कराविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

तहसीलदार संजय भोसले यांनी मंडळ अधिकारी शंकर जैस्वाल यांना तालुक्यात होत असलेले अवैद्य वाळू तस्करी रोखण्यासाठी हद्दीत गस्त घालून कारवाई करण्याचे आदेश बुधवारी दुपारी १२ वाजता दिले होते. त्यावरून जैस्वाल हे कोटनांद्रा, धानोरा, लोणवाडी, भराडी, पळशी, मोढा खुर्द येथील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) पोपट तायडे, संतोष इंगळे, अशोक निकाळे, सुमित बमनावत, दीपक जगताप, सुरज लांडकर, सुरक्षा रक्षक पी.के. मोरे, वाहन चालक बालाजी गायकवाड यांच्या पथकासोबत गस्तीवर निघाले. धानोरा, सिसारखेडा, भराडी, दिडगाव परिसरातील दिडगाव व उपळी रस्त्यावर पथकाने दोन विना क्रमांकाचे ट्रॅक्टर विना परवाना वाळू वाहतूक करतांना पकडले. त्यात प्रत्येकी एक ब्रास वाळू होती.

महसूल पथकाने दोन्ही ट्रॅक्टर पकडल्याने वाळू तस्कर दादाराव दुधे काही लोकांसोबत तेथे आला. त्याने पथकाशी वाद घातला. अचानक त्यांनी महसूल पथकावर दगडफेक करत हल्ला चढवला. त्यानंतर दोन्ही ट्रॅक्टर घेऊन चालक तेथून निघून गेले. एवढ्यावरच न थांबता त्यानंतर २० ते २५ लोकांचा जमाव वाळू तस्कर घेऊन आले. त्यांनी पथकावर दगडांचा वर्षाव केला. पथक वाहनांच्या आड लपले असता त्यांनी दगडफेक करून वाहन फोडले. त्यातच एकाने थेट कॅनमधील डिझेल टाकून जीप पेटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षा रक्षकाने प्रतिकार केल्याने जमाव मागे हटला. त्यानंतर कसेबसे पथकातील कर्मचारी जीव वाचवून तेथून सुरक्षित स्थळी आले. त्यानंतर पोलीस आणि तहसीलदारांना त्यांनी फोनवर माहिती दिली. 

दरम्यान, रात्री १० ते १ वाजेपर्यंत सिल्लोडचे तहसीलदार संजय भोसले, पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत व पोलीस कर्मचाऱ्यांनी पथकासह पुन्हा पूर्णा आणि अंजना नदीचा परिसर पिंजून काढला. पण तोपर्यंत सर्व वाळू तस्कर फरार झाले होते. भराडी येथील मंडळ अधिकारी शंकर मोहनलाल जैस्वाल ( ५७ ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, त्यानुसार वाळू तस्कर ट्रॅक्टर चालक विलास सखाराम पांढरे, वाळू तस्कर ट्रॅक्टर मालक राजू उर्फ बंडू पुंडलीक फोलाने, दुसरा ट्रॅक्टर चालक विजय संजय शेजुळ, वाळू तस्कर ट्रॅक्टर मालक दादाराव मिठ्ठू दुधे ( सर्व रा.उपळी ता.सिल्लोड ) या आणि इतरांच्याविरुद्ध महसूल विभागाच्या पथकावर हल्ला, त्यांची जीप ( क्रमांक एम.एच. २०  जी.के. ९०६८ ) फोडून डिझेल टाकून पेटविण्याचा प्रयत्न आणि खातखेडा शिवारातील अंजना नदीतील वाळू चोरी प्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.

मकोका लावला पाहिजेसिल्लोड तालुक्यात वाळू तस्कर कुणालाही जुमानत नाहीत. कारवाई करण्यास गेले की जीवघेणे हल्ले करतात. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या वाळू तस्करांवर मकोका लावला पाहिजे. पथकावर हल्ले केले म्हणजे आम्ही खचून जाणार नाही. आता पोलीस व महसूल अशी संयुक्त कारवाई करून वाळू तस्करांच्या नांग्या ठेचू.- संजय भोसले, तहसीलदार, सिल्लोड

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारीsandवाळूRevenue Departmentमहसूल विभाग