शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील १३ हजारांपैकी साडेचार हजार कंपन्याच भरताहेत कर्मचाऱ्यांचा पीएफ

By प्रशांत तेलवाडकर | Updated: February 15, 2024 18:32 IST

बाकीच्या कंपन्या फक्त कागदावर असून कर्मचाऱ्यांचा पीएफ न भरल्याने त्यांची चौकशी सुरू झाली आहे

छत्रपती संभाजीनगर : भविष्य निधी आयुक्त कार्यालयांर्तगत मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत मिळून १३ हजार कंपन्यांची नोंदणी झाली आहे. त्यातील केवळ साडेचार हजार कंपन्याच आपल्या कर्मचाऱ्यांचा ‘पीएफ’ भरतात. बाकीच्या कंपन्या फक्त कागदावर असून कर्मचाऱ्यांचा पीएफ न भरल्याने त्यांची चौकशी सुरू झाली असल्याची माहिती भविष्य निधी आयुक्त जगदीश तांबे यांनी दिली. ‘लोकमत’च्या ‘ग्रेट भेट’ मुलाखतीत त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली.

ऑनलाइन सिस्टिम झाली तरी खातेदारांना कार्यालयात का यावे लागते ?उत्तर : मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत मिळून २४ लाख पीएफ खातेदारांची नोंद आहे. संपूर्ण सिस्टम ऑनलाइन झाली आहे. यामुळे कोणाला ऑफिसमध्ये येण्याची आवश्यकता नाही. कंपनीतील ‘एच आर’ विभागाने त्यांच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या योग्यरीत्या पीएफच्या केसेस हाताळल्या तर खातेदारांना पीएफ ऑफिसमध्ये येण्याची गरज नाही. मात्र, त्रुटी दुरुस्त न करता एचआर विभागाचे कर्मचारी सरळ कर्मचाऱ्यांना पीएफ ऑफिसमध्ये जाण्याचा सल्ला देतात. असे काही खातेदार आहेत त्यांच्याकडे स्मार्ट मोबाइल नाही. त्यांना संगणक आणि इंटरनेटचे ज्ञान नाही, असे खातेदार ऑफिसमध्ये येत असतात. ई-सेवा केंद्रातही त्यांचे काम होऊ शकते. यामुळे ऑनलाइन कारभार असूनही खातेदार कार्यालयात गर्दी करतात.

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पीएफ मिळण्यास अडचण का येते?उत्तर : अनेक असे कर्मचारी आहेत, ज्यांना निवृत्त होऊन अनेक वर्षे झाली पण त्यांचे प्रश्न सुटले नाहीत. याचे कारण, म्हणजे ते जिथे काम करीत होते ती कंपनी असो वा ऑफिस येथील एचआर विभागाने त्यांची संपूर्ण माहिती दिलेली नसते. नावात, जन्मतारखेमध्ये चुका करून ठेवलेल्या असतात. अनेकांनी अधिक सेवेचा फायदा घेण्यासाठी जन्मतारीख कमी किंवा जास्त टाकलेली असते. आधार कार्ड व पीएफ खात्यातील नाव, जन्मतारीख जुळत नाही. यात पीएफ ऑफिसला दोष देऊन चालणार नाही. कंपनी, ऑफिसकडून जी माहिती येते, त्याचेच रेकॉर्ड तयार होते. कंपनीतील एचआर विभागाची चूक असते. मात्र, नाव पीएफ ऑफिसचे बदनाम होते.

वर्षभरात थकबाकीदारांवर काय कारवाई ?उत्तर : ज्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचे पीएफ थकविले आहेत, त्यांच्या विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. १५९ थकबाकीदारांचे बँक खाते गोठविण्यात आले. खात्यात रक्कम असूनही पीएफ न भरल्याने थकबाकीदार व्यवस्थापनावर कारवाई केली जात आहेच; शिवाय संबंधित बँक व्यवस्थापकांवरही कारवाई सुरू आहे.

मनपा, नगर परिषद, शासकीय कार्यालये पीएफ भरतात का?उत्तर : नगर परिषदा, मनपा, शासकीय कार्यालये, विद्यापीठ हे त्यांच्याकडील ठेकेदारांची यादी देत नाहीत. यामुळे कंत्राटी कामात किती कर्मचारी, मजूर आहेत. हे कळत नाही. वसमत, जिंतूर, अंबाजोगाई, किनवट येथील नगरपालिकांनी २०१२ पासून माहितीच न दिल्याने त्यांची चौकशी सुरू आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादbusinessव्यवसाय