शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात भाजपने टाळला उद्धवसेनेशी थेट सामना ! अशा होतील लढती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 19:12 IST

भाजपची तीन जागांवर काँग्रेसशी लढत; तर बीडमध्ये शरद पवारांच्या उमेदवाराशी गाठ

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील लोकसभेच्या आठही मतदारसंघांतील लढतींचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. महायुतीत भाजप सर्वाधिक चार जागांवर लढणार असला तरी भाजपने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी थेट सामना टाळल्याचे दिसून येते. तीन जागांवर भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होणार आहे, तर बीडमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप लढणार आहे.

मराठवाड्यात लोकसभेचे आठ मतदारसंघ आहेत. जालना वगळता इतर मतदारसंघांतील उमेदवार निश्चित झाल्याने तेथील लढतींचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीत जालन्याची जागा काँग्रेसला सुटली असली तर काँग्रेसला अद्याप उमेदवार ठरविता आलेला नाही. ‘मविआ’त उद्धव सेनेकडे चार जागा आल्या असून काँग्रेस तीन, तर बीडची एकमेव जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडे गेली आहे.

पवार काका-पुतण्याकडे बीड आणि उस्मानाबादराष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर होत असलेल्या या पहिल्याच निवडणुकीत शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजित पवार यांच्या वाट्याला खूप कमी जागा आलेल्या आहेत. उस्मानाबादची जागा अजित पवार गटाकडे, तर बीडची जागा शरद पवार गटाला सुटली आहे. तिथे अनुक्रमे अर्चना पाटील आणि बजरंग सोनवणे यांना उमेदवारी मिळाली आहे.

तीन ठिकाणी भाजप विरुद्ध काँग्रेसमराठवाड्यातील आठ पैकी नांदेड, लातूर आणि जालना मतदारसंघात भाजपची लढत काँग्रेससोबत असेल, तर बीडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षासोबत.

अशा होतील लढती-नांदेड : भाजप विरुद्ध काँग्रेसलातूर : भाजप विरुद्ध काँग्रेसजालना : भाजप विरुद्ध काँग्रेसबीड : भाजप विरुद्ध राष्ट्रवादी (शरद पवार)हिंगोली : उद्धवसेना विरुद्ध शिंदेसेनाऔरंगाबाद : उद्धवसेना विरुद्ध शिंदेसेनाउस्मानाबाद : उद्धवसेना विरुद्ध राष्ट्रवादी (अजित पवार)परभणी : उद्धवसेना विरुद्ध रासप

विद्यमान खासदारभाजप : नांदेड, लातूर, बीड, जालनाउद्धवसेना : परभणी, उस्मानाबादशिंदेसेना : हिंगोलीएमआयएम : औरंगाबाद

टॅग्स :BJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Shiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४aurangabad-pcऔरंगाबादbig Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४