शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
4
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
5
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
6
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
7
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
8
किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
9
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
10
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
11
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
12
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
13
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
14
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
15
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
16
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
17
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
18
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
19
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
20
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 

थरारक! बायपासवर लघुशंकेसाठी कार थांबवताच ठेकेदाराचे बंदुकीच्या धाकावर अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 18:26 IST

कुख्यात गुन्हेगारांनी पुण्याच्या ठेकेदारास छत्रपती संभाजीनगरात लुटले

छत्रपती संभाजीनगर : एमआयटी महाविद्यालयात लँड स्केपिंग डिझायनिंग करण्यासाठी पुण्याहून आलेला ठेकेदार बीड बायपासवर लघुशंकेसाठी थांबल्यानंतर तीन आरोपींनी पिस्टल, चाकूचा धाक दाखवून फिर्यादीच्याच गाडीत बसवून अपहरण केले. बीड बायपासवरून चारचाकीत मारहाण करीत दौलताबाद भागात नेत त्यांच्याजवळचे ३५ हजार आणि फोन पेवर पैसे मागवून घेत ६९ हजार व सोन्याची बाळी, असा ऐवज लुटला. ही घटना १८ जूनच्या रात्री १२ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, गुन्हे शाखेने या टोळीचा पर्दाफाश केला असून, तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.

अक्षय ऊर्फ भैया रमेश वाहूळ (२४, रा. बावनघर, सातारा परिसर), कुणाल गौतम जाधव (२६, रा. अयोध्यानगर, एन ७, सिडको) आणि विनोद सुभाष शिंदे (२१, रा. गरमपाणी), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. अक्षयविरुद्ध ११, कुणालविरुद्ध ७ आणि विनोदवर १ गुन्हा दाखल आहे. अक्षयवर ३ वेळा एमपीडीए व १ वेळा हद्दपारीची कारवाई झालेली आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली.

अजित उत्तम जाधव (३३, रा. चाकण रोड, आळंदी, जि. पुणे) असे अपहरण झालेल्या डिझायनिंग ठेकेदाराचे नाव आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, त्यांनी एमआयटी कॉलेजमधील काम करण्यासाठी घेतले होते. १८ जूनला दिवसभर काम केल्यानंतर शिवाजीनगर भागातील हॉटेलमध्ये जेवायला गेले. तेथून झाल्टा फाटा येथे मित्राला भेटण्यासाठी निघाले. रात्री ११:३० वाजता कारने (एमएच ४२ एएक्स ६०९१) जात असताना बीड बायपासवरील नवीन हेडगेवार हॉस्पिटलजवळ लघुशंकेसाठी थांबले. तेवढ्यात एका दुचाकीने ट्रीपलसीट लुटारू आले. त्यातील एकाने पाठीमागून येत चाकू लावत कारमध्ये बसायला लावले. चालकाच्या सीटवर बसल्यानंतर एकजण बाजूला बसला. दोघे मागील सीटवर बसले. मागील सीटवर बसलेल्या लुटारूने डोक्याला पिस्तूल लावून गाडी चालवायला सांगितली. त्यानंतर दोन मोबाइल, ३५ हजार रोकड असलेली बॅग हिसकावली. त्यातील एकजण अधूनमधून मारहाण करीत होता.

लुटारूंनी जाधव यांना पत्नीकडून फोन पेवर पैसे मागायला लावले. पत्नीने ३० हजार पाठविले. ते पैसे काढण्यासाठी आरोपींनी कार एटीएमकडे नेली. मात्र, तेथून फक्त ४ हजार रुपये निघाले. त्यानंतर दुसऱ्या एटीएमवर जाऊन ही रक्कम काढून घेतली. ६५ हजार रुपये हातात पडल्यानंतरही आरोपींनी पुन्हा पत्नीकडे पैसे मागायला लावले. जाधव यांनी पत्नीला फोन करून पैसे मागितल्यावर पत्नीने फोन पे वरून पैसे जात नसल्याचे कळविले. मात्र, त्याचवेळी आरोपीने मोबाइल हिसकावून ‘अगर तू पैसे नही भेजेगी तो ये मर जायेगा’ अशी धमकी दिली आणि फोन ठेवला. त्यानंतर पत्नीने जाधव यांच्या वडिलांना हा प्रकार सांगितला. वडिलांनी ३० हजार रुपये पाठविले, मात्र क्रांती चौक पोलिसांना माहिती देऊन अजित जाधव अडचणीत असल्याचे कळविले. त्यानंतर क्रांती चौक पोलिसांनी जाधव यांच्या मोबाइलवर फोन करून विचारपूस केली. मात्र, हा प्रकार लुटारूंना समजला. त्यानंतर आरोपींनी जाधव यांना पुन्हा मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

कार थांबविताच फिर्यादी पळालेआरोपी जाधव यांना मारहाण करण्यासाठी कार थांबविताच जाधव हे कारचा दरवाजा उघडून पळून गेले. एका दुकानाच्या मागे गवतात लपून बसले. काही वेळाने रस्त्यावर आल्यानंतर एकाच्या मदतीने पोलिसांना फोन लावला. पोलिसांच्या मदतीने एमआयडीसी सिडको ठाण्यात आणले. तेथे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

१८ जून रोजीही दोघांना लुटलेया लुटारूंच्या टोळीने १८ जूनच्या रात्री बीड बायपासवर अजित जाधव यांच्यासह महेश रावसाहेब नरवडे (३४, रा. विश्रांतीनगर, मुकुंदवाडी) आणि शरद वायाळ या दोन्ही मित्रांनाही मारहाण करून लुटले. त्यांचे दोन मोबाइल, १० हजार रोकड आणि बायोमेट्रिक मशीन, असा ऐवज लुटला होता. या प्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारीPuneपुणे