शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई: वाशीत कारमध्ये १६ लाख रूपयांची रोखड सापडली, आचारसंहिता पथकाची कारवाई
2
"पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प यांना वेळीच फोन केला असता तर...!"; अमेरिकन वाणिज्यमंत्र्याचा मोठा खुलासा
3
सबरीमाला मंदिरातील सोन्याच्या चोरी प्रकरणी मुख्य पुजारी ताब्यात, एसआयटीची कारवाई   
4
एस जयशंकर यांना अमेरिकेत करावा लागला रस्त्याने ६७० किमी प्रवास; बलाढ्य अमेरिकेवर ट्रम्प यांनी ही काय वेळ आणली...
5
‘महायुती सत्तेवर आली तरी मुंबईचं बॉम्बे होणार नाही, पण उद्धव ठाकरे सत्तेवर आले तर...’, नितेश राणेंचा दावा 
6
कर्जबाजारी पाकिस्तानचा ओव्हर कॉन्फिडन्स; फायटर जेट विकून IMF चे कर्ज फेडण्याचा दावा
7
केवळ एकच व्हिडीओ, अन् यूट्युबवर लावली ‘आग’, केली ९ कोटींची कमाई, नेमकं काय आहे त्यात? 
8
PMC Election 2026: शिवसेना स्वबळावर लढत आहे, म्हणून कुणीही हलक्यात घेऊ नका; एकनाथ शिंदेंचा इशारा
9
"इम्तियाज जलील हा भाजपाचा हस्तक, त्याने शहराला..."; ठाकरेंच्या नेत्याचा घणाघात, फडणवीसांवरही 'बाण'
10
डोनाल्ड ट्रम्प यांची आर्थिक 'दादागिरी'? उदय कोटक यांनी २०२४ मध्येच केली होती भविष्यवाणी
11
स्टार क्रिकेटर Jasprit Bumrah चा 'रशियन सुंदरी' सोबतचा फोटो व्हायरल; कोण आहे 'ही' तरुणी?
12
Chanakya Niti: अपमान करणाऱ्याला कसं उत्तर द्यायचं? शिका चाणक्य नीतीचे 'हे' ५ वाग्बाण 
13
मोठा निष्काळजीपणा! नर्सने कापला दीड महिन्याच्या बाळाचा अंगठा, नेमकं काय घडलं?
14
० ० ० ० ० ० ... ६ चेंडूत हव्या होत्या ६ धावा... महाराष्ट्राचा 'जादूगार' रामकृष्णने जिंकवली मॅच
15
तुमचा iPhone हॅक तर झाला नाही ना? 'या' ४ गोष्टी दिसताच समजा कुणीतरी करतंय तुमची हेरगिरी
16
इराणच्या 'या' निर्णयाचा भारताला मोठा फटका, 2000 कोटी रुपयांवर आडलं घोडं...! काय आहे संपूर्ण प्रकरण?
17
भारतीय क्रिकेट विश्वावर शोककळा; मैदानावरच फलंदाजाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
18
Malegaon Municipal Election 2026 : भाजपच्या दोन बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी, वरिष्ठांच्या आदेशान्वये कारवाई
19
अपघातग्रस्तावर मोफत उपचार! मदत करणाऱ्याला ₹25 हजारांचे बक्षीस; मोदी सरकार आणतेय नवीन योजना
20
Share Market Down: शेअर बाजारात ५०० अंकांपेक्षा अधिक घसरण, निफ्टीबी २५,८०० च्या खाली; 'ही' आहेत ५ कारणं
Daily Top 2Weekly Top 5

छ. संभाजीनगरात ऑफरमुळे दुकानात झुंबड, ३ महिलांना चक्कर; दुकान मालकांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 19:54 IST

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून दखल : चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावणार

छत्रपती संभाजीनगर : कोणतेही सुरक्षा उपाययोजना न करता कपड्यांच्या खरेदीवर आकर्षक सूट घोषित केल्याने दुकानात झुंबड चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण होऊन तीन महिला बेशुद्ध पडल्या. याप्रकरणी बेजबाबदारपणा करणाऱ्या दुकान मालक कृष्णा रघुनाथ देशमुख (३०, रा. सातारा देवळाई परिसर) व संजय ललवाणी या दोघांवर जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आकाशवाणी परिसरात टेंज द फॅशन वर्ल्ड हे कपड्याचे दुकान रविवारी सुरू झाले. दुकानाच्या उद्घाटनापूर्वी दुकान मालकांनी सोशल मीडियात विविध रिल्सच्या माध्यमातून किरकोळ दरात कपड्याची विक्री होणार असल्याची जाहिरात केली. या आकर्षक जाहिरातीला भुलून शेकडोंनी रविवारी सकाळीच फ्रिडम टॉवर्सच्या परिसरात गर्दी केली. दुकानात जाण्यासाठी एकच शटर असून, आतमध्ये मोठ्या संख्येने नागरिक गेल्यामुळे उभे राहण्यासही जागा नव्हती. त्याशिवाय नागरिकांनी दुकानात गेल्यानंतर प्रत्येक वस्तू उचलून घेतल्याने गोंधळ उडून चेंगराचेंगरी झाली. दुकानासह बाहेरही शेकडोंचा जमाव जमला. यामुळे पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली. चेंगराचेंगरीत चक्कर आलेल्या महिलांना सुखरूप बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दुकानचालकाच्या बेजबाबदारपणावर संतापऐन निवडणुकीत घडलेल्या या प्रकारामुळे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दुकानचालकाच्या बेजबाबदारपणावर संताप व्यक्त केला. पोलिस निरीक्षक सचिन कुंभार यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. पोलिस अंमलदार पुंडलिक मानकापे यांच्या तक्रारीवरून कृष्णा देशमुख व संजय ललवाणीवर कारवाई करण्यात आली. दोघांना नोटीस बजावून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक कुंभार यांनी सांगितले.

काय ठेवलाय ठपका?आरोपींना मोठी सूट घोषित करताना लहान व अपुऱ्या जागेत गर्दी होऊन आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते, याची कल्पना होती. तरीही त्यांनी दुकानाजवळ रुग्णवाहिका, फिरते शौचालय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आपत्कालीन मार्ग अशी कुठलीच उपाययोजना केली नाही. त्यांच्या हलगर्जीपणामुळे जमलेली गर्दी व गोंधळामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊन व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आली. तसेच शहरात मनपा निवडणूक असल्याने आचारसंहिता, पोलिस आयुक्तांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला.

English
हिंदी सारांश
Web Title : Offer Stampede in Chhatrapati Sambhajinagar: Women Faint, Case Filed

Web Summary : Attractive clothing discounts in Chhatrapati Sambhajinagar led to a stampede. Three women fainted due to overcrowding. Police filed a case against the shop owners for negligence and violating safety norms during the promotional event.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर