घाटी रुग्णालयात पुन्हा डॉक्टरला मारहाण, निवासी डॉक्टरांचे कामबंद आंदोलन
By संतोष हिरेमठ | Updated: August 3, 2022 11:52 IST2022-08-03T11:51:39+5:302022-08-03T11:52:03+5:30
घाटी रुग्णालयातील अपघात विभागात रात्री सर्जरीच्या डॉक्टरला रुग्णासोबत असलेल्या व्यक्तीकडून मारहाण झाली.

घाटी रुग्णालयात पुन्हा डॉक्टरला मारहाण, निवासी डॉक्टरांचे कामबंद आंदोलन
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात निवासी डॉक्टरला पुन्हा एकदा मारहाणीची घटना घडली असून, या घटनेनंतर निवासी डॉक्टरांनी कामबंद आंदोलन सुरू केले.
मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. अक्षय क्षीरसागर यांनी सांगितले की, घाटी रुग्णालयातील अपघात विभागात रात्री सर्जरीच्या डॉक्टरला रुग्णासोबत असलेल्या व्यक्तीकडून मारहाण झाली. त्यामुळे सर्व निवासी डॉक्टरांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
घाटीत मागील आठवड्यातही एका निवासी डॉक्टरला मारहाणीचा प्रकार झाला होता. मारहाण करणाऱ्या रुग्णाच्या मुलाने माफी मगितल्यानंतर प्रकरण निवळले होते. आता पुन्हा एकदा निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.